आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या प्रदीप पाटील याच्याविरुद्ध धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीप हा वैद्यकीय प्रतिनिधी असल्याची माहिती पेालिसांनी दिली आहे.
यासंदर्भात शहर पोलिसांकडे पिडीत २१ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. तिच्या तक्रारीनुसार प्रदीप भिकन पाटील (२५) हा तरुण गेल्या सहा महिन्यांपासून तरुणीला त्रास देत होता. तरुणीचा पाठलाग करणे, वारंवार बोलण्याचा प्रयत्न करणे असले प्रकार त्याच्याकडून सुरू होते.
या प्रकाराला ही तरुणी कंटाळली होती. काल मंगळवारी सव्वासात वाजेच्या सुमारास ही तरुणी घराजवळ असताना प्रदीपने तिला अडविले. तसेच तिच्याशी असभ्य वर्तन करून तिचा विनयभंग केला. याशिवाय तरुणीला धमकीही देण्यात आली. त्यामुळे या तरुणीने धुळे शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तिच्या तक्रारीवरून प्रदीपविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक योगिता ठाकरे या घटनेचा तपास करीत आहेत.
बातम्या आणखी आहेत...