आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदी भाषेत प्रेम आणि सौहार्द भाव वसलेला, प्रा.ए.बी.पाटील यांचे मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 जळगाव: हिंदीभाषेत प्रेम आणि सौहार्द भाव वसलेला आहे. तिच्यात इतर भाषेतील शब्दांना सहज स्वीकारण्याची क्षमता आहे. त्यामुळे भाषिक विकास नियमानुसार ती अधिक व्यापक आहे. राष्ट्रभाषेकडून विश्वभाषेकडे हिंदीचा झालेला प्रवास थक्क करणारा आहे, असे मत प्रा. ए. बी. पाटील यांनी व्यक्त केले. 
 
मूजे महाविद्यालयाच्या हिंदी विभागातर्फे मंगळवारी विश्व हिंदी दिनानिमित्त कार्यक्रम झाला. या वेळी प्रा. पाटील बोलत होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.सुरेश तायडे हे हाेते. त्यांनी ‘हिंदी भाषेतील भाषिक साहित्यिक बलस्थाने विशद केली. वर्तमान संदर्भातील हिंदीच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. हिंदी भाषेच्या सन्मानासाठी १० जानेवारी हा विश्व हिंदी दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने मू. जे. महाविद्यालयाच्या हिंदी विभागाकडून व्याख्यानाचा आणि हिंदी कथा-हिंदी लघुनाटकांच्या प्रसारणाचा कार्यक्रम घेण्यात आला. 

विद्यार्थी विजय पावरा याने हिंदीच्या संदर्भात मनोगत व्यक्त केले. या वेळी हिंदी विभागातील प्रा.विजय लोहार प्रा.रोशनी पवार उपस्थित होते. प्रास्ताविक माधुरी जगताप हिने केले. मुक्ती महाजन हिने सूत्रसंचालन केले. धनराज पावरा याने आभार मानले. कार्यक्रमास प्राध्यापक इतर कर्मचारी उपस्थित हाेते. 
 
लोकसेवक मधुकरराव चौधरी यांनी हिंदी प्रचार समिती वर्धाच्या अध्यक्षपदी असताना भारतात पहिले विश्व हिंदी संमेलन १९७५ ला नागपूर येथे आयोजित केले. तेव्हापासून हिंदीला विश्व स्तरावरील भाषा बनवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यातून आपल्या विश्व बंधुत्व मूल्यांची रुजवणूक सक्रिय होणार यात शंका नाही. कारण भाषा ही जोडण्याचे काम करते, ती मैत्रीचा सेतू असते. हिंदी भाषेत ती संभावना विद्यमान आहे, प्रा. पाटील म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...