आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुट्यांचा परिणाम: ऑनलाइन गेमचा टक्का वधारला, रोज उलाढालीत २० हजारांनी वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- उन्हाच्या तडाख्यामुळे एकीकडे विजेचा वापर वाढत आहे. तसा इंटरनेटचा वापरही वाढला आहे. सुटीच्या काळात विविध कंपन्यांनी दिलेल्या पॅकेजचा फायदा घेत तरुणाई मोबाइल गेममध्ये अडकली आहे. गत महिन्यापेक्षा तब्बल ३० टक्क्यांनी इंटरनेट सेवांची उलाढाल वाढली आहे. सायंकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत उन्हामुळे घराबाहेर जाऊ शकत नसल्यामुळे अगदी पाचवीच्या विद्यार्थ्यापासून सगळीच मंडळी मोबाइलवरील विविध गेम व्हॉट्सअॅपला चिपकून राहत असल्याचे उघडकीस यायला लागले आहे. या गेम प्लॅनमुळे केबल सेवेलाही झळ बसायला लागली आहे.

शहरात तरुणांमध्ये इंटरनेट वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. शाळा-महाविद्यालयांना सुट्या लागल्याने गेम, मनोरंजनासाठी इंटरनेटचा नेहमीपेक्षा ३० टक्के जास्त वापर वाढला आहे. स्मार्टफोन तसेच टॅबवर विविध प्रकारचे गेम खेळण्यात तरुण प्रौढही गुंग झाल्याचे दृश्य कुठेही सहज पाहायला मिळते. शाळेतील विद्यार्थीही अगदी सहजपणे कार्टून, गेम खेळतात. त्यांची सतत नवीन गेम्सची मागणी असते. तरुण आणि प्रौढ वर्गाची स्थितीही थोड्याफार फरकाने सारखी असल्याने साहजिक इंटरनेटचीही मागणी वाढली आहे. त्यासाठी अनेकांचा इंटरनेट पॅकचा बजेटही वाढला आहे. काही जण दर महिन्याला एक जीबीचा उपयोग करीत होते. त्यांना आता महिन्यातून दोन वेळा इंटरनेट रिचार्ज करावा लागत आहे. तर छोटा रिचार्जची सर्वात चलती आहे. त्याचा उपयोग तत्काळ इंटरनेटवर मित्रांशी चॅटिंग, महत्त्वाचा व्हीडीओ, फोटो डाऊनलोड, सेंट करण्यासाठी करण्यात येत आहे. अशा प्रकारे शेअरिंग करण्यासाठी, सतत अपडेट राहण्यासाठी इंटरनेट आवश्यक खर्चाचा भाग झाला आहे.

वीस रुपयांपासून रिचार्ज
इंटरनेटचावापर सध्या वाढला आहे. त्याचे पॅकेजही विविध प्रकारचे आहेत. त्यात सर्वांच्या आवाक्यात ते आहेत. अगदी वीस रुपयांपासून हजार रुपयांपर्यंतचे विविध प्रकारचे रिचार्ज उपलब्ध आहे. किमतीप्रमाणे कालमर्यादा आहे.
दहाते वीस हजारांचे रिचार्ज
शहरातसर्वच कंपन्यांचे इंटरनेट वापर करणारे नागरिक आहेत. थ्रीजी सेवा, नेटचा स्पीड यावरून कंपनीला प्राधान्य देण्यात येते. दररोज वीस हजार रुपयांपर्यंत इंटरनेटचे रिचार्ज करण्यात येते.
सुटीत वाढतो नेटचा बजेट
सुट्याअसल्याने संगणक, टॅब, मोबाइलवर गेम, चित्रपट डाऊनलोड करण्यात येतात. काही वेळा ऑनलाइनही पाहण्यात येते. त्यासाठी त्याचा वापर वाढल्याने साहजिकच नेटचा बजेटही वाढला आहे.
विविध प्लॅनचा फायदा
इंटरनेटचा वापर लहानांपासून प्रौढांपर्यंत वाढला आहे. त्यातल्या त्यात तरुण वर्ग हा चोखंदळ ग्राहक आहे. इंटरनेट वापरताना कंपनी सतत काही ना काही ऑफर देतात. विशिष्ट रिचार्जवर काही एमबीपासून जीबीपर्यंत मोफत देतात. त्याचा फायदा घेण्यासाठी एकतर तेवढ्याचे रिचार्ज करतात किंवा सिमकार्ड पोर्टेबिलिटी करतात. तेवढ्यासाठी नवीन कार्ड विकत घेतात.