आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कशीश उदासी यांचे नगरसेविकापद वांध्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १६ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका कशीश उदासी यांनी निवडणुकीत सादर केलेल्या जातवैधता प्रमाणपत्रप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर कामकाज होऊन जातपडताळणी समितीने कशीश उदासी यांच्या जातवैधता प्रमाणपत्रावर समितीला तपासणी करून फेरनिर्णय घेण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहे. त्यामुळे समिती काय निर्णय घेेते याकडे लक्ष लागून आहे. तोपर्यंत कशीश उदासी यांच्या जातप्रमाणपत्रामुळे त्यांचे नगरसेवकपद वांध्यात येते की काय याची चर्चा मात्र सुरू झाली आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची महापालिकेत सत्ता आहे. यात नगरसेविकांचीही भूमिकाही महत्त्वपूर्ण आहे. यात प्रभाग क्रमांक १६ मधून प्रथम ओबीसी महिला मतदार प्रवर्गातून कशीश उदासी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली तर त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या तिकिटावर डॉ. अपूर्वा परदेशी यांनी लढत दिली.
यात कशीश उदासी या निवडणुकीत विजयी झाल्या. त्यांनी ओबीसी जागेवर निवडणूक लढवताना जातवैधता प्रमाणपत्र सादर केले. त्याला डॉ. अपूर्वा परदेशी यांनी न्यायालयात आव्हान देऊन त्यांच्याविरोधात याचिका दाखल केली. त्यावर कामकाज होऊन औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयात म्हटले आहे की, जातपडताळणी समितीने कशीश उदासी यांना दिलेल्या जातवैधता प्रमाणपत्राचा निर्णय रद्द करून समितीने यावर तपासणी करून फेरनिर्णय घ्यावा. त्याचप्रमाणे निकालाची प्रत अद्याप हाती मिळालेली नाही. त्यामुळे ती प्रत हाती आल्यावर त्यातील सविस्तर वृत्त कळणार आहे. मात्र, यामुळे नगरसेविका कशीश उदासी यांचे नगरसेवक पद वांध्यात आल्याचे चित्र आहे. कशीश उदासी या महिला बालकल्याण सभापतिपदी एक वर्ष राहिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या निष्ठावान कार्यकर्त्यांपैकी आहेत.
समितीला फेरनिर्णय घेण्याचे आदेश
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका कशीश उदासी यांच्या जातवैधता प्रमाणपत्रावर आक्षेप घेत डॉ. अपूर्वा परदेशी यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर जातपडताळणी समितीला फेरनिर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने केले आहे, अशी माहिती दोन्ही पक्षाचे वकील अॅड. ई.एस. मुर्गे अॅड. अमाेल सावंत यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...