आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एलबीटीचा दणका; सात व्यापाऱ्यांना ८२ हजारांचा दंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- महापालिकेच्या स्थानिक संस्था कर विभागाने शहरातील सात व्यापाऱ्यांकडून ८२ हजार ६७१ रुपयांचा दंड वसूल केला. या कारवाईत बंग व्यापारी संकुलातील सदाशिव स्टोअर्स कॉस्मेटिकच्या संचालकांना १६ हजार, आग्रारोडवरील मुंबई फर्निचरच्या संचालकांना चार हजार २००, गल्ली नंबर चारमधील रेणुका एन्टरप्रायझेसच्या संचालकांना पाच हजार ४०० रुपये, सदाशिव प्रोव्हिजनच्या संचालकांना हजार ८०० रुपये, राजकमल टॉकीजजवळ अमृत टी डेपोच्या संचालकांना आठ हजार ७५४, भंगार बाजार मदिना स्टील लोखंड पाइपच्या संचालकांना आठ हजार ७५४ तर अन्य एका ठिकाणाहून १६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या व्यावसायिकांकडे एलबीटी क्रमांक, पक्के बिल, हिशेब पुस्तके, खरेदी रजिस्टर नव्हते. त्यामुळे त्यांना दंड करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...