आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
धुळे: सध्या बदलत्या ट्रेण्डनुसार लाइफस्टाइलही बदलली आहे. या बदललेल्या लाइफस्टाइलप्रमाणे घरातील होम अप्लायन्सेसही बदलले आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे घरातील मोठ्ठा डब्बारूपी टीव्हीची जागा आता कॉम्पॅक्ट टीव्हीने घेतली आहे. त्यामुळे होम अप्लायन्सेसच्या बाजारात कॉम्पॅक्ट टीव्हींची नवीन भलीमोठी रेंज बाजारात आली आहे.
एलसीडी, एलईडी आदी टीव्हींमध्ये विस्तीर्ण अशी रेंज आहे. पंधरा इंचांपासून अगदी 60 इंचांपर्यंत हे टीव्ही बाजारात उपलब्ध आहेत. तसेच रोजच नवनवीन फंक्शन या टीव्हींमध्ये येत आहेत. विशेष म्हणजे, हे टीव्ही घरात ठेवण्यासाठी अगदी कमी जागा लागत असल्याने नागरिकांकडून ते खरेदी करण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यात अनेक नामवंत कंपन्यांचे टीव्ही आहेत. पिर क्वॉलिटी व आकर्षक रंगसंगती असल्याने हे टीव्ही पाहताना वेगळाच आनंद मिळतो. केबलद्वारे होणारे प्रक्षेपण व्यवस्थित होत नसल्याने या टीव्हींसाठी डीटीएच बसविण्यात येते. त्यामुळे डीटीएचलाही मागणी वाढली आहे. फ्लॅट टीव्हीचा फायदा म्हणजे एकाच वेळी तीस चॅनल पाहण्याची सुविधाही या टीव्हींमध्ये आहे. याशिवाय मेन्यू व्हय़ूही विविध प्रकारचे असल्याने टीव्ही पाहताना वेगळीच मजा येते. या टीव्हींना इंटर्नल यूएसबी कनेक्शन, एचडीएमआय केबल सुविधा, कॉम्प्युटर जोडूनही पिर पाहण्याची मजा घेता येते. अगदी दहा हजारांपासून एक लाख रुपयांपर्यंत या टीव्हींची किंमत आहे. धुळय़ातही होम अप्लायन्सेसच्या दुकानांत हे टीव्ही उपलब्ध आहेत. या टीव्हींना 5.1 चॅनल सिस्टीम असल्याने सराउंड साउंडची जादूई मजा घरबसल्या मिळते. याशिवाय इनबिल्ट यूएसबीमुळे हवा तो चित्रपट, गाणी ऐकता येऊ शकतात. दरम्यान, या फ्लॅट टीव्हींमुळे खोक्यासारखे असणारे जाड ट्यूबवाले टीव्ही आता हद्दपार होऊ लागले असून, ते केवळ टीव्ही रिपेअरिंगच्या दुकानांत दिसत आहेत. एलसीडी टीव्हीला जागा कमी लागत असल्याने आता डब्बा टीव्हींना बाहेरचा रस्ता दाखवला जात असून, हे टीव्ही भंगारात जात असल्याचे चित्र आहे.
Sponsored By
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.