आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिव्ह इन रिलेशनशिप प्रकरणी अर्ज फेटाळला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये पतीप्रमाणे सुजितसोबत संबंध होते. तसेच सुजितची पत्नी सपना (तिघांची नावे काल्पनिक) इतरांनी मारहाण केली तर देवपूर पोलिसांनी तक्रार दाखल केली नाही, असे आरोप करणाऱ्या श्रेयाचा पुनर्निरीक्षणाचा अर्ज न्या. प्रदीप घुगे यांनी फेटाळला.
श्रेयाला सुजितची पत्नी मुलांनी मारहाण केली. त्यानंतर देवपूर पोलिसांनी प्रत्यक्ष तसेच टपालाने दिलेली श्रेयाची तक्रार दाखल केली नाही. त्यामुळे तिने अॅड. विनोद बोरसे यांच्या मार्फत कनिष्ठ न्यायालयात विनंती अर्ज दाखल केला होता. देवपूर पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावे, अशी विनंती त्यात करण्यात आली होती. न्यायालयाने पीडित श्रेयाला शपथेवर साक्ष देण्याचे निर्देश दिले होते. यानंतर श्रेयाने अॅड. विनोद बोरसे यांच्या मार्फत वरिष्ठ न्यायालयात पुनर्निरीक्षणाचा अर्ज दाखल केला होता.
न्या. प्रदीप घुगे यांच्या समक्ष या प्रकरणाचे कामकाज सुरू होते. अखेर न्या. घुगे यांनी कनिष्ठ न्यायालयाने श्रेयाला शपथपत्रावर साक्षीसाठी दिलेला आदेश योग्य आहे. त्यामुळे त्यात फेरफार करण्याची गरज नाही, असे मत नोंदवून पुनर्निरीक्षणाचा अर्ज फेटाळून लावला आहे.
- या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात संबंधितांना दाद मागता येऊ शकते.
अॅड. विनोद बोरसे
बातम्या आणखी आहेत...