आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकमान्य टिळक रुग्णालयाचा मातृ दुग्धपेढी उपक्रम; बाळाला दूध पाजण्यासाठी सरसावताहेत यशोदा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नऊ महिने पोटात वाढविलेल्या बाळाला जन्म दिल्यानंतर ते बाळ काही कारणाने आईच्या दुधाला पारखे झाले तर त्याचे पोषण नीट होत नाही. अशावेळी या बाळांची आई बनून मुंबईतील यशोदारूपी काही माता अशा बाळांना दूध पाजू लागल्या आहेत.
या बाळांना दूध मिळावे म्हणून मुंबई येथील शीव उपनगरातील लोकमान्य टिळक रुग्णालयात एक मातृदुग्ध पेढीच (मिल्क बँक) स्थापन करण्यात आली असून प्रतिवर्षी एक हजारहून अधिक लिटर आईचे दूध येथे साठवले जात आहे. केवळ राज्यातील रुग्णालयांनीच नव्हे तर देशभरातील रुग्णालयांनी असा उपक्रम राबविणे गरजेचे आहे.आई नसलेल्या, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ज्या बाळांना आईचे दूध मिळू शकत नाही अशा बाळांसाठी मातृदुग्ध पेढीतील दूध वापरले जाते.
मार्गदर्शक तत्त्वे, जनजागृतीची गरज

मातृदुग्धपेढीसंदर्भात पुण्यात एप्रिलमध्ये परिषद झाली. त्या वेळी केंद्रीय आरोग्य कुटुंबकल्याणमंत्री जे. पी. नड्डा यांनी मातृ दुग्धपेढीबाबत नियम मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. तसेच देशात याबाबत जनजागृतीचेही त्यांनी आश्वासन दिले होते. याबाबत लवकरच कार्यवाही होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
५४ लिटरची साठवण

जानेवारीते एप्रिल या तीन महिन्यांमध्ये तीन मातांनी मिळून ५४ लिटर दूध दुग्धपेढीसाठी दिले आहे. प्रतिवर्षी साठवले जाणारे एक हजार लिटरहून अधिक दूध अनेक बाळांसाठी अमूल्य असे वरदान ठरते आहे. यापैकी वैदेही देशमुख (नाव बदलले आहे) या मातेशी संपर्क साधला असता आईच्या दुधाला पारख्या हाेणाऱ्या बाळासाठी माझे दूध देणे हे मी माझे भाग्य समजते असा प्रकल्प प्रत्येक रुग्णालयात चालवायला हवा असे मला वाटते असे मत नाेंदवले.
कसे साठवले जाते दूध-
६२.५अंश सेल्सियस तापमानात दूध पाश्चराइज्ड केले जाते
उणे २२ अंश सेल्सियस तापमानात दूधाची साठवणूक केली जाते. प्रतिवर्षी दूधाची नव्याने नाेंदणी.
राज्यात ग्रामीण भागात ३० टक्के तर शहरी भागात २५ टक्के महिला बाळाला दूध पाजण्यास सक्षम नसतात अशावेळी होते या साठवलेल्या दुधाची मदत.
तांत्रिकदृष्ट्या सुसज्ज अशा दुग्धपेढीमध्येच दूध साठवले जाते. दूध आधी पाश्चराइज्ड करून मगच ते लगेच थंड करून साठवले जाते. डॉ.सुजाता जाधव, टेक्निशियन, लोकमान्यटिळक रुग्णालय.
दुग्धपेढी ही काळाची गरज आहे. आम्ही जसे एक हजार लिटरहून अधिक दूध साठवतो तसे देशातील प्रत्येक रुग्णालयाने असे करण्याची गरज आहे. डॉ.स्वाती मणेरीकर, मातृदुग्धपेढी विभाग, लोकमान्य टिळक रुग्णालय

बातम्या आणखी आहेत...