आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेची आत्महत्या; शिक्षक पतीसह आठ जणांवर गुन्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- तालुक्यातील देऊर बुद्रुक येथील अश्विनी देवरे यांच्या आत्महत्येनंतर शिक्षक असलेल्या तिच्या पतीसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्विनीला वेडसर म्हणून हिणवले जात होते. तसेच तिला त्रास दिला जात होता, अशी तक्रार तिचा भाऊ चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. त्यावरून हा गुन्हा दाखल झाला आहे.
देऊर बुद्रुक येथील अश्विनी शरदचंद्र देवरे (३५) यांनी काही दिवसांपूर्वी स्वच्छतागृहात पेटवून घेतले होते. गंभीररीत्या भाजलेल्या अश्विनी देवरे यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी त्यांचा भाऊ चंद्रकांत पुंडलिक पाटील (३०, निशाणे, ता. शिंदखेडा) यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार अश्विनीचा पती शरदचंद्र देवरे, सासरा मोतीराम दगाजी देवरे, शकुंतला मोतीराम देवरे, मनोहर मोतीराम देवरे, महेंद्र मोतीराम देवरे (सर्व रा. देऊर), मंगला प्रल्हाद पाटील, प्रल्हाद राजधर पाटील (दोघे रा. रावेर, ता. धुळे) हे गेल्या काही दिवसांपासून अश्विनीचा छळ करत होते.
तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यासोबत अश्विनी हिला वेडसर म्हणून वारंवार हिणवले जात होते. नेहमीच्या या प्रकाराला कंटाळून तिने जाळून घेऊन आत्महत्या केली, अशी तक्रार चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. त्यावरून धुळे तालुका पाेलिस ठाण्यात भादिंव कलम ३०६,४९८-अ,३२३,५०४,५०६,३४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...