आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामे हाेणार नसतील तर महापालिका बरखास्त करा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - महापालिकेकडून विकास कामे हाेत नसतील तर पालिका बरखास्त करा, असा शब्दात नगरसेवकांनी स्थायी समितीत संताप व्यक्त केला. नगरसेवक कामे घेऊन येतात. त्यांचीच काेम हाेत नसतील तर जनतेची कामे काय हाेत असतील, असा प्रश्नही त्यांनी केला. या वेळी भाजप नगरसेविका प्रतिभा चाैधरी सभापती साेनल शिंदे यांच्यात शाब्दिक चकमकही उडाली. निधीअभावी कामे हाेत नसल्याचे सांगत शिंदे यांनी अातापर्यंत राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी निधी अाणल्याचा टाेला भाजपला दिला. अाता भाजपचे सरकार अाहे. तेव्हा भाजप नगरसेवकांनी निधीसाठी सरकारला साकडे घालावे, असेही शिंदे म्हणाले. दरम्यान अॅलम खरेदीचा अहवाल माहिती घेतल्यानंतर अायुक्तांना दिला जाईल, अशी माहिती उपायुक्त रवींद्र जाधव यांनी दिली.
स्थायी समितीची सभा गुरुवारी झाली. या वेळी पुन्हा विकास कामांचा विषय पुढे अाला. यावरून मनपा बरखास्तीचा सरळ सल्लाही नगरसेवकांनी दिला. महापालिकेत कोणतीच कामे वेळेवर होत नाही. त्यामुळे जनतेला सुविधा मिळत नाही. पाच ते सहा महिन्यांनंतर शौचालय दुरुस्तीचा विषय मंजूर होत आहे. मनपात कामेच होत नसल्याने बरखास्तीचा ठराव करावा, असे नगरसेविका प्रतिभा चौधरी यांनी सभापती सोनल शिंदे यांना ठणकावून सांगितले. त्यावर सोनल शिंदे यांनी निधीच्या अडचणीमुळेच कामे होत नाही. राज्य केंद्रात भाजपचे सरकार असल्याने तुम्हीच निधीसाठी प्रयत्न केल्यास शहर विकासाची कामे होतील. यापूर्वी राष्ट्रवादी कांॅग्रेसच्या नेत्यांनीच प्रयत्न करून निधी आणला आहे. त्यातून कामे सुरू असल्याचे सांगितले. या मुद्द्यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली; परंतु यानिमित्ताने का हाेईना बरखास्तीचा मुद्दा चर्चेला अाल्याचे दिसले.

त्याचवेळी संदीप पाटोळे, मायादेवी परदेशी, साबीर अली मोतेबर यांनी अॅलम खरेदीचा विषय काढला. अॅलम खरेदीचा विषय स्थायी समितीत चर्चेसाठी ठेवण्यात आला; परंतु खरेदीचे दर जास्त हाेत. म्हणून चर्चा करून विषय मंजूर करावा, अशी मागणी सदस्यांनी केली. सभागृहात सदस्यांना चर्चाच करू दिली नाही.

त्यामुळे सदस्यांचा बहुमताने विरोध असताना हा विषय मंजूर कसा केला. त्यावर प्रशासनाला विचारणा केल्यावर उपायुक्त रवींद्र जाधव यांनी सदस्यांनी सभागृहात मांडलेली बाजू प्रशासनाची टिप्पणी यांचे अवलोकन करून आयुक्तांना त्याचा अहवाल देण्यात येणार आहे, असे सांगितले. त्याचबराेबर उपायुक्त रवींद्र जाधव सहायक अायुक्त अभिजित कदम यांना स्थानिक संस्था कर अधिकारी म्हणून आयुक्तांचे अधिकार प्रदान करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या वेळी सभापती सोनल शिंदे, उपायुक्त रवींद्र जाधव, सचिव मनोज वाघ आदींसह नगरसेवक होते.

स्थायीत दोन विषय तहकूब
स्थायी समितीच्या विषयपत्रिकेवर तीन विषय चर्चेसाठी होते. त्यातील एक विषय स्थायी समिती सदस्यांना माहितीसाठी देण्यात आला होता. तर उर्वरित विषयात पारोळा रोड चौफुली येथे मुख्य जलवाहिनीस गळती लागली होती. ती दुरुस्त करण्यात आली. त्यासाठी लाख ६३ हजार ९७५ रुपये आलेल्या खर्चास मंजुरीचा विषय होता. मात्र त्याची पूर्ण माहिती अंदाजपत्रक सादर करावे, असे सांगितले. तर दोन सफाई कामगारांची शास्ती माफ करण्याचा विषय होता. हे दोन्ही विषय तहकूब करण्यात आले आहे.

डेंग्यूप्रकरणी कारवाई करा
शहरात डेंग्यूचे पॉझिटिव्ह रुग्ण अाढळून येत आहेत. त्या प्रकरणी मनपा जीवशास्त्रज्ञ यांच्यावर कारवाईचा ठराव सभेत करण्यात आला आहे. त्यानंतर त्या महिनाभरापासून रजेवर आहेत. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत फरक पडलेला नाही. सप्टेंबरपासून आतापर्यंत शंभर डेंग्यूचे रुग्ण आढळले. त्यामुळे यास इतरही अधिकारी, कर्मचारी जबाबदार आहेत. त्याची चौकशी करून कारवाई करावी, अशा सूचना सोनल शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. त्यावर साबीर अली, प्रतिभा चौधरी यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
बातम्या आणखी आहेत...