आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लहान पुलाजवळचा चौक ठरतोय रहदारीस घातक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डाव्या बाजूकडून अचानकपणे येणाऱ्या वाहनांमुळे होतात अपघात; सकाळी अन‌् सायंकाळी सदर चौक बनतो मृत्यूचा सापळा धुळे लहान पूल ज्योती चित्रपटगृहाजवळ असलेला चौक अनेक वर्षांपासून धोकादायक ठरत आहे. या ठिकाणी असलेला उतार, धोकादायक वळण यामुळे चौकात नेहमीच लहानमोठे अपघात होत असतात. प्रशासनाने या चौकात आवश्यक सूचना फलकांसोबत काही कामे हाती घेण्याची गरज आहे. सोबतच या चौकात दुभाजकांचीही गरज आहे.
पांझरा नदीवर असलेल्या लहान पुलाला लागूनच शिवाजीरोड आहे. या रोडवर श्री स्वामी समर्थ केंद्र, अंजनशाह बाबा दर्गा, मंगल कार्यालये इतर मंदिरे आहेत. याच चौकातून महापालिका देवपूरच्या दिशेनेही जाता येते. शिवाय विविध शासकीय कार्यालये, वसाहती शहराच्या इतर भागात जाण्यासाठी या चौकात सतत वर्दळ असते; परंतु या चौकात असलेला मोठा उतार बऱ्याचदा अपघाताला कारणीभूत ठरतो.
या भाैगाेलिक परिस्थितीसोबतच या चौकाजवळ वाहतूक नियम दर्शवणारा कोणताही फलक लावण्यात आलेला नाही. शिवाय रस्त्यावर कुठेही पांढरे पट्टे आखण्यात आलेले नाही. त्यामुळे बऱ्याचदा महापालिकेकडून सुसाट येणारी वाहने दर्ग्याच्या दिशेने वळताना अपघात संभवताे. असाच धोका शिवाजीरोडवरून येणाऱ्या वाहनधारकांनाही होतो.
त्यामुळे चौकात दुभाजक टाकल्यास हा प्रश्न सुटू शकतो. सोबतच हे दुभाजक निर्माण करताना तेदेखील धाेकादायक ठरणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. चौकात दुभाजक असल्यास पलीकडील वाहनांशी धडक होण्याचा धोका कमी होतो. शिवाय कोणत्याही दिशेने येणाऱ्या वाहनचालकाला ब्रेक लावण्यासोबत वळण घेण्यासही संधी मिळू शकेल; परंतु दुभाजकाचा अभाव असल्यामुळे शिवाजीरोडने येणाऱ्या वाहनांना महापालिकेकडे जाण्यासाठी वळण घेताना अडचणी येतात. एवढेच नव्हे तर चढ असल्यामुळे काही वेळेस वाहनही बंद पडते. या चौकातील उतार आणि दुसऱ्या दिशेने येणारी वाहने दिसत नसल्यामुळे वाहनधारकांना मुठीत जीव घेऊन जावे लागते. तसेच मध्य प्रदेश, नंदुरबार, शिरपूर, शिंदखेड्याच्या दिशेने जाणाऱ्या बसेसही याच चौकातून जातात.
दरम्यान, शिवाजीरोडवरील विविध प्रार्थनास्थळे, भाविकांची गर्दी यामुळे महापालिकेने काही महिन्यांपूर्वीच दर्ग्याजवळ गतिरोधक तयार केले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांची गती कमी होते; परंतु उतारावरून येणारी वाहने येऊन धडकण्याचा धोका कायम राहतो.येथे गतिरोधक बसवणे शक्य नसल्यामुळे प्रशासनाने सूचनादर्शक बसवावेत.
याची आहे गरज....
- चौकात असावा पोलिस कर्मचारी.
- उतारावर गती कमी असावी.
- सूचना फलकांची गरज.
- पांढरे पट्टे आखण्यात यावे.