आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अार्थिक राजधानी मुंबईसह राज्यात घटली चिनी वस्तूंची ४० टक्के मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - डाेकलाम परिसरातील चीनची अागळीक अाणि भारताला त्या देशाकडून दरराेज मिळत असलेल्या युद्धाच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांमध्ये चिनी बनावटीच्या वस्तू नाकारण्याची मानसिकता जाेर धरू लागली अाहे. भलेही खिशावर ताण अाला तरी चालेल, पण यंदा सणासुदीला ‘मेड इन इंडिया’च्या वस्तूच खरेदी करू असा ‘ट्रेंड’ सध्या बाजारात दिसत अाहे. परिणामी गणेशाेत्सवात चिनी बनावटीच्या सजावटीच्या वस्तू अाणि लायटिंगच्या माळांची विक्री तब्बल ४० टक्क्यांपर्यंत घटली अाहे. देशाची अार्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून महाराष्ट्राच्या कानाकाेपऱ्यातही हेच चित्र पहायला मिळते अाहे, हे विशेष. 
गणेशाेत्सवापासून दिवाळीपर्यंत लायटिंगच्या माळा, वेगवेगळ्या प्रकारचे हॅलाेजन, फाेकस, पणत्या, पणत्यांच्या माळा, अाकाश कंदिल यांची माेठ्या प्रमाणावर विक्री हाेत असते. भारतीयांचे हे सण चीनने ‘कॅश’ केल्याचे चित्र दरवर्षी बाजारपेठेत पहायला मिळते. मात्र डाेकलाममधील तणावाच्या स्थितीमुळे या सणासुदीच्या काळात भारतीयांची मानसिकता चीनच्या विराेधात तयार हाेत असल्याचे बाजारपेठेत दिसू लागले अाहे. सजावटीच्या वस्तू खरेदीला अालेले दहापैकी किमान चार ग्राहक यंदा जाणीवपूर्वक चिनी वस्तूंची माहिती घेऊन खरेदी टाळत अाहेत. भलेही खिशावर थाेडा जास्त भार पडला तरी चालेल. चीनच्या तुलनेत काही प्रमाणात भारतीय वस्तू महागड्या असल्या तरी गॅरंटी अाणि देशप्रेम यामुळे पसंती दिली जात अाहे, हीच स्थिती रक्षाबंधनातही पहायला मिळाल्याचे अाॅल इंडिया इलेक्ट्राॅनिक असाेसिएशनचे सेक्रेटरी मितेश माेदी यांनी सांगितले. 

४० टक्के विक्री घटली 
^इलेक्ट्रिकल वस्तूंमध्ये चिनी मालाला माेठी मागणी या काळात असते, मात्र नाशिकचे ही विक्री ४० टक्के घटली अाहे. लाेकांत चीनबद्दल असंताेष अाहे. -मनाेज माेटवानी, संचालक, वैष्णवी इलेक्ट्रिकल्स 

^मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा अामच्या उत्पादनांना प्रचंड मागणी वाढली अाहे. चिनी वस्तू बऱ्यापैकी लाेक नाकारत असल्याचे चित्र असल्याने भारतीय उत्पादकांना उत्पादन वाढवावे लागत अाहे. चिनी वस्तू स्वस्त पण गॅरंटी नसलेल्या तर भारतीय थाेड्याशा महाग पण गॅरंटीसह उपलब्ध अाहेत. -अमित कुलकर्णी, संचालक, नेव्हिटस इफिशन्स 

भारतीय उत्पादकांना संधी 
{चीनने उत्पादनावर भर दिल्याने अाज माेठी निर्यात, भारताला देखील उत्पादन वाढविण्यावर भर देणे अावश्यक. 
{मेक इन इंडियासारख्या उपक्रमांत विदेशी उद्याेगांना सवलती, देशांतर्गत उद्याेगांनाही सक्षम करणे गरजेचे. 
{सध्या तेल अायातीवर सर्वाधिक विदेशी चलन खर्च, २०२० मध्ये ही जागा इलेक्ट्राॅनिक हार्डवेअर, साॅफ्टवेअर घेईल. 

मुंबईत विक्री घटली 
^युद्धाच्या चर्चांमुळे भारतीयांची मानसिकता चीनचा माल खरेदी करण्याची पहायला मिळते अाहे. किमान ४० टक्के चिनी मालाची विक्री यामुळेच थंडावली अाहे. रक्षाबंधनाच्या वेळीही हीच स्थिती हाेती. केवळ युद्ध हाेईल म्हणूनच नाही तर कायमस्वरूपी भारतीय वस्तूंना स्थानिक बाजारपेठ मिळत रहावी त्यांची किंमतही कमीत कमी रहावी याकरिता भारत सरकारनेही पुढे येऊन भारतीय छाेट्या-माेठ्या उद्याेगांना करसवलती देऊन उत्पादनासाठी प्राेत्साहन देणे अपेक्षित अाहे. -मितेश माेदी, सेक्रेटरी, अाॅल इंडिया इलेक्ट्राॅनिक असाेसिएशन 
बातम्या आणखी आहेत...