आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नव्या जलकुंभाला विराेध झाला तर पाेलिस बंदाेबस्तात काम करा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे -शहरात जलकुंभांना नागरिकांचा विराेध हाेत राहिला तर जलकुंभ उभारणे शक्य हाेणार नाही. जिथे केवळ तीस टक्के नागरिकांचा विराेध अाहे. त्यांच्याशी बाेलून बाजू समजावून द्यावी, अन्यथा पाेलिस बंदाेबस्तात जलकुंभाचे काम करावे, अशी मागणी भाजपच्या नगरसेविका प्रतिभा चाैधरी यांनी केली. संभाजीनगर पारिजात काॅलनीतील जलकुंभावर ‘दिव्य मराठी’ने अावाज उठवल्यानंतर मनपाच्या स्थायी सभेतही त्याचे पडसाद उमटले. या विषयावर मत मांडताना नगरसेविका चाैधरी यांनी पाेलिस बंदाेबस्तात काम करा, असे सांगितले. दरम्यान शहरात रस्त्यावर कचरा फेकणे, बांधकाम साहित्य पडू देणाऱ्यांना दंंड आकारला जाणार अाहे. त्या विषयाला मंजुरी देण्यात अाली.
महापालिकेच्या स्थायी समितीची सभा बुधवारी झाली. त्यात नगरसेविका प्रतिभा चाैधरी यांनी जलकुंभांचा विषय घेतला. त्या म्हणाल्या की, जयहिंद काॅलनी परिसरात जलकुंभ बांधण्यासाठी नागरिकांचा विरोध होत आहे. आनंदनगर येथे विरोध झाल्यानंतर तो जलकुंभ पारिजात काॅलनीतील शहाजीराजे उद्यानात उभारण्याचा निर्णय झाला. जलकुंभाचे काम सुरू झाल्यावर नागरिकांनी विरोध केला. ते काम बंद आहे. मात्र, परिसरात हा जलकुंभ आवश्यक अाहे.
अायुक्तांनी नागरिकांची बैठक घेऊन चर्चा करावी. त्यानंतरही विरोध झाल्यास पोलिस बंदोबस्त घेऊन काम सुरू करावे. तसेच परिसरात पाइपलाइन टाकण्याचे काम त्वरित सुरू करावे, असेही प्रतिभा चाैधरी म्हणाल्या. याचवेळी प्रभागातील शौचालयाची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणीही केली. त्यावर प्रशासनाने कामाचा कार्यादेश देण्यात आला आहे. लवकरच काम सुरू होणार असल्याचे सांगितले. घनकचरा सार्वजनिक उपद्रव व्यवस्थापन, संसर्गजन्य आजाराच्या साथराेग, नागरी िहवताप योजना, डुकरे पाळण्यासाठी ठेवण्यासाठी दंड आकारणी करण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली. या वेळी साबीर अली यांनी सांगितले की, नागरिकांनी रस्त्यावर कचरा फेकणे, ओला, सुका कचरा वेगळा करणाऱ्यांवर दंडाची आकारणी करण्यात येणार आहे; परंतु कचरा उचलण्यासाठी प्रभागात स्वच्छता करण्यासाठी महापालिकेने नियमित व्यवस्था करावी. या वेळी त्यांच्या प्रभागात केवळ तीन स्वच्छता कर्मचारी आहेत. त्यांच्याकडून पूर्ण प्रभाग स्वच्छ करणे शक्य हाेत नाही. अनेकदा कर्मचारी वाढवून देण्याची मागणी करण्यात आल्यानंतरही दुर्लक्ष केले आहे. इस्माईल पठाण यांनीही त्यांच्या प्रभागातील शौचालय तोडण्यात आले असून, नवीन शाैचालय अद्याप बांधण्यात आलेले नाही. या अडचणी या वेळी सभेत मांडल्या. यावर सभापती सोनल शिंदे यांनी प्रशासनाला पूर्णपणे सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. या चर्चेनंतर दंड आकारणी करण्याच्या िवषयाला मंजुरी देण्यात आली अाहे. या वेळी सभेला सभापती सोनल शिंदे, उपायुक्त रवींद्र जाधव सचिव मनोज वाघ उपस्थित हाेते.

राेजंदारी दरवाढ लागू
मनपातीलरोजंदारी बदली कामगारांना दरवाढ लागू करण्यात आली. कुशल कर्मचाऱ्यांना ४९९ रुपये रोज होता त्यात १४२ रुपयांची वाढ करण्यात येऊन ६४१ रुपये मिळणार आहे. तर अकुशल कर्मचाऱ्यांना ४७३ रुपये रोज होता. त्यात १२९ रुपयांची वाढ करण्यात येऊन ६०२ रुपये नवीन दराप्रमाणे रोजंदारी देण्यात येणार आहे. यामुळे तिजोरीवर दीड कोटींची भर पडेल.

दंडाची आकारणी करा...
^शहरात स्वच्छताअभियान राबवण्यात येत आहे. त्यात स्वच्छ प्रभाग उपक्रम सुरू केला आहे. त्याची सुरुवात प्रभाग क्रमांक १३ मधून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आता रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांना दंड आकारण्यात येणार अाहे. यात नागरिकांनी दंड भरल्यास त्या रकमेचा त्यांच्या घरपट्टीत समावेश करावा. -संजयगुजराथी, नगरसेवक

असा आकारणार दंड
शहरातकचरा रस्त्यावर सार्वजनिक जागेवर टाकल्यास १०० रुपये दंड, ओला-सुका कचरा वेगळा केल्यास १० रुपये दंड, रस्त्यात बांधकाम साहित्य, माती टाकणे ५०० रुपये दंड, उघड्यावर शौचास बसणे १०० रुपये दंड, रस्त्यावर थंुकणे ५० रुपये दंड, डास, अळी निर्मिती आढळल्यास १०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...