आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकच्या कलावंतांना हाकला, चित्रपटविराेध नकाे, अबू अाझमी यांची भूमिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - ‘पाकिस्तानी कलावंत देशात व्हिसा घेऊन आले. सरकारने त्यांचा व्हिसा रद्द करून त्यांना देशाबाहेर काढावे. पण त्यांच्या चित्रपटाला विराेध करू नये,’ अशी भूमिका समाजवादी पक्षाचे अामदार अबू अाझमी यांनी बुधवारी मांडली. एका पाकिस्तानी कलावंताच्या चित्रपटात तीनशे भारतीय कलावंतही काम करतात, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असेही ते म्हणाले.
समाजवादी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीनिमित्त शहरात आलेल्या आझमी यांनी पत्रकार परिषदेत वेगवेगळ्या विषयावर मते मांडली. ते म्हणाले की, ‘पाकिस्तानच्या दहशतवादाचे समर्थन होऊ शकत नाही. मात्र, त्याचा संदर्भ कलावंतांशी जोडून सांप्रदायक वाद निर्माण करण्याचे काम राज ठाकरे करीत आहेत. पाकिस्तानी कलावंतांना सरकारने व्हिसा दिलेला आहे. त्यांनी एखाद्या चित्रपटात काम केले म्हणून ते चित्रपट पाहू नये, प्रदर्शित करू नये असा इशारा राज ठाकरे देत आहेत. तर दुसरीकडे सरकार हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी पोलिस बंदोबस्त देत अाहे. त्यामुळे सरकार राज ठाकरेंना घाबरत आहे की समर्थन करीत आहे असा प्रश्न निर्माण होत आहे, असेही अामदार अाझमी यांनी सांगितले.

उरी येथील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या शौर्याला सलाम आहे. मात्र, त्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्यांनी कधी गडचिरोली, गोंदिया येथील परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले अाहेत काय?’ असा प्रश्नही आमदार आझमी यांनी केला आहे.
बातम्या आणखी आहेत...