आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवकाच्या मृत्यूप्रकरणी तहसीलदार, ठेकेदारांवर गुन्हा; धुळे जिल्ह्यातील प्रकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- अक्कडसे (जि. धुळे) येथील युवकाच्या नदीत बुडून मृत्यूप्रकरणी वाळू ठेकेदारासह महसूल विभागाच्या सात अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात अाला. न्यायालयाच्या आदेशाने  शिंदखेडा पोलिस ठाण्यात बुधवारी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. यात संबंधित तीन ठेकेदारांसह दोन तहसीलदार, दोन मंडळ अधिकारी, दोन तलाठी आणि एक प्रांताधिकाऱ्याचा समावेश आहे.   

याबाबत किशोर भगवान कोळी (वय ३८) यांनी शिंदखेडा न्यायालयात धाव घेतली होती. दि. ९ एप्रिल रोजी ११ वाजता अक्कडसे येथील सतीश छोटू सैंदाणे (वय १९) हा अक्कडसे येथून मनुमाता मंदिरावर जावळाच्या कार्यक्रमासाठी जात होता. तापी नदीपात्रातून जात असताना  साचलेल्या पाण्यात तो पडला. हा खड्डा ५० फुटांहून माेठा हाेता. त्यामुळे  सतीशचा तेथेच बुडून मृत्यू झाला. नदीपात्रातील हा खड्डा बुजवून आरोपींनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हा खड्डा  जळगाव येथील वाळू  ठेकेदार  दीपक सुधाकर पाटील, गोरख शालिग्राम पाटील, ज्ञानेश्वर बन्सी पाटील यांनी बेकायदेशीररीत्या वाळू उत्खनन करून निर्माण केला होता.

वाळू ठेकेदारांना उप्परपिंड (ता.शिरपूर) येथील घाट क्रमांक एक या क्षेत्रात वाळू ठेका मंजूर झालेला होता. तेथे वाळू उपसा न करता त्यांनी अक्कडसे (ता. शिंदखेडा) गावाच्या शिवारात विविध यंत्रसामग्री वापरून शर्तींचा भंग करून ५० फुटांहून खोल वाळू उत्खनन केले. त्यामुळे त्या ठिकाणी मोठा व खोल खड्डा निर्माण झाला. या खड्ड्यात पाणी साचले आणि येथूनच जाताना सतीश छोटू सैंदाणे याचा बुडून मृत्यू झाला.

हे अधिकारी अडकले   
बेकायदेशीर कामाकडे अक्कडसे येथील तलाठी सुभाष साळुंखे, मंडल  अधिकारी एस. आर. पाकरकर, शिंदखेडा तहसीलदार रोहिदास वारुडे, उप्परपिंड येथील तलाठी जयवंत चव्हाण, मंडळ अधिकारी  व्ही. के. बागुल, शिरपूर उपविभागीय अधिकारी नितीन गावंडे आणि शिरपूर तहसीलदार महेश शेलार यांनी दुर्लक्ष केले. सतीशच्या मृत्यूबाबतचा हा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप करून वाळू ठेकेदारांसह हे सात अधिकारीही सतीश सैंदाणे याच्या मृत्यूस जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
बातम्या आणखी आहेत...