आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता पोस्टात आधार कार्डची दुरुस्ती; पोस्टमन घरपोच देणार शासकीय योजनांचा लाभ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शासनाच्या विविध योजनांचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना मिळावा, तसेच कोणताही आर्थिक अपहार होऊ नये यासाठी केंद्र शासनाने आता योजनांचा निधी डाक विभागाच्या माध्यमातून थेट पोस्टमनद्वारे लाभार्थ्यांना घरपोच देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासह आधारकार्ड अपडेटिंगची सुविधा ग्राहकांना आता थेट पोस्टातून मिळणार आहे. यासाठी २० कर्मचाऱ्यांना नाशिक येथे प्रशिक्षण देण्यात आले आहे. ती सुविधा लवकरच सुरू करीत असल्याची माहिती मुख्यडाक अधीक्षक बी. व्ही. चव्हाण यांनी दिली. 

 

पोस्टाच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा, यासाठी ग्रामीण भागातदेखील ऑनलाइन सेवा सुरू करण्यात येत आहे. तसेच इंडिया कोअर बँकेच्या माध्यमातून नागरिकांना सेवा देण्यासाठी महाराष्ट्र विभागातील सुमारे १३०० पोस्ट कार्यालयातून इंडियन पोस्टल पेमेंट बँक सुविधा करण्यात येत असून ही प्रक्रिया मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे. महाराष्ट्र विभागातील कर्मचाऱ्यांना आधारकार्ड प्रशिक्षणास गुजरातमधील बडोदा येथे जावे लागत होते. मात्र, पैसा वेळ वाचवण्यासाठी हे केंद्र नाशिकरोड येथे सुरू केले आहे. डाक विभागातून २० कर्मचारी प्रशिक्षणास गेले आहेत. ३० नोव्हेंबरपर्यंत प्रशिक्षण पूर्ण होईल. यानंतर ते अन्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देतील पुढील वर्षांपासून आधारकार्ड अपडेटिंग करण्यास पोस्टातून सुरुवात होईल, असेही चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान गॅस सबसिडीची रक्कमही ग्राहकांच्या पोस्ट खात्यात जमा होणार आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांचे गणवेश, शिष्यवृत्तीचा लाभही पोस्टात जमा होणार असून याबाबत जिल्हा परिषदेशी पत्रव्यव्हार सुरू आहे. 


मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्रात प्रशिक्षण केंद्र 
देशाचेमहत्त्वपूर्ण अभियान असलेल्या आधारकार्डचे प्रशिक्षण डाक कर्मचाऱ्यांना देण्यात येत होते. नागरिकांना आता पोस्टामधून आधारकार्ड काढता येणार आहे. तसेच ज्यांना आधारकार्डमध्ये बदल करायचे असतील त्यांना पोस्टातून हे बदल करून मिळणार आहे. देशात सध्या गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये हे प्रशिक्षण केंद्र होते. आता महाराष्ट्रात सुरू करण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...