आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभापतींच्या पतीराजांची मुजाेरी; अधिकाऱ्याचे साहित्य दालनाबाहेर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - येथील पंचायत समितीत सभापती अनिता पा,टील यांना माेठे दालन मिळावे म्हणून त्यांचे पती प्रभाकर पाटील यांनी चक्क पशुधन विभागाच्या अधिकाऱ्यांचे साहित्य दालनाबाहेर काढले. केवळ ताेंडी अादेश देऊन अधिकाऱ्याच्याच दालनावर बळजबरीने कब्जा करण्यात अाला. या प्रकाराने सभापतींच्या पतीचा कारभारात हस्तक्षेप वाढल्याचे दिसून अाले. त्यांच्या या मुजाेरीमुळे कर्मचारीही भयभीत झाले हाेते. याबाबत पशुधन अधिकारी डाॅ. डी. के. पाटील म्हणाले की, सभापतींनी सांगितले असते तर दालन रिकामे करून दिले असते. पण सभापतींचे पती अादेश देणारे काेण, असा प्रश्नही त्यांनी केला. नवीन इमारतीत अाता दालनासाठी भांडाभांडी सुरू असल्याचे यावरून दिसायला लागले अाहे.
धुळे पंचायत समितीत सभापतींना देण्यात आलेले दालन आकाराने लहान अाहे. त्यामुळे अभ्यागतांना बसण्यासाठी जागा नाही. सभापती अनिता पाटील यांनी नवीन दालनाची मागणी केली. त्यानुसार गटविकास अधिकाऱ्यांनी पशुधन विकास अधिकारी डाॅ. डी.के. पाटील यांना देण्यात आलेले दालन सभापतींना द्यावे, असे तोंडी आदेश दिले. त्यानंतर शनिवारी सायंकाळी सभापती अनिता पाटील यांचे पती प्रभाकर पाटील यांनी पशुधन विकास अधिकारी डॉ. डी. के. पाटील यांना दालन द्यावे, अशी मागणी केली. या वेळी गटविकास अधिकारी उल्हास सोमवंशी यांनी डॉ. पाटील यांना एक पत्र देत कार्यालय हस्तांतरणाचे आदेश दिले. तेव्हा डॉ. पाटील यांनीही दोन दिवसांचा अवधी द्यावा, अशी विनंती केली. मात्र याची दखल घेता शनिवारी सायंकाळी अचानक सभापतींचे पती प्रभाकर पाटील यांनी कार्यालय हस्तांतरणाची तयारी सुरू केली. या वेळी पशुधन विकास अधिकारी डाॅ. पाटील प्रभाकर पाटील यांच्यात शाब्दिक खडाजंगीही झाली. एकीकडे अधिकारी दालनातील महत्त्वपूर्ण दस्तएेवजामुळे शनिवारी दालन सोडायला तयार नव्हते. डॉ.पाटील कार्यालयात काम करीत असतानाच सभापतींचे पती प्रभाकर पाटील यांच्या आदेशानुसार शिपाई, परिचर यांनी सभापतींच्या दालनातील साहित्य पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या दालनात हलवायला सुरुवात केली. पशुधन विकास अधिकाऱ्यांचे साहित्य बाहेर काढले. कोणतेच घटनादत्त अधिकार नसताना केवळ सभापतींचे पती म्हणून प्रशासकीय इमारतीत घातलेला हा धुडगूस सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांना झोंबणारा हाेता. सायंकाळी वाजता सभापतींच्या दालनातील साहित्य शिफ्ट झाल्यानंतर दालनाला कुलूप ठाेकण्यात आले. मात्र याच वेळेस पशुधन विकास विभागातील महत्त्वपूर्ण दस्तएेवज, पशुपालकांना वितरित करावयाचे खाद्य बाहेर पडून होते. उद्या रविवारी सुटी अाहे. त्यामुळे हे साहित्य जैसे थे पडून राहील. त्यावर कोण लक्ष ठेवले, असा प्रश्न आहे.

सभापतींचे पती टेबल उचलतील का?
^गटविकास अधिकाऱ्यांकडे नवीन दालनाची मागणी केली होती. याबाबत डॉ.पाटील यांना गटविकास अधिकाऱ्यांनी सूचना केली. तसेच लेखी आदेश देऊन त्यांच्यासमोर दालन खाली करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी टेबल-खुर्च्या उचलल्या, सभापतींचे पती काय टेबल उचलतील का. -प्रभाकरपाटील, पंचायत समिती सभापतींचे पती

सभापतींच्या पतींना कुठला अधिकार...
^सभापतींना दालन देण्यास कोणाचीच हरकत नाही. त्यासाठी किमान दोन दिवसांचा अवधी मागितला होता. बीडीओंचे आदेशही दुपारी वाजता मिळाले. सभापतींचे आदेश असते तर हरकती नव्हती. मात्र त्यांचे पती कोण, त्यांना कोणताच नैतिक अधिकार नाही. या प्रकरणी वरिष्ठांशी चर्चा करून शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल. -डॉ.डी. के. पाटील, पशुधन विकास अधिकार, पंचायत समिती धुळे

साहित्य इतरत्र पडून
दुसऱ्यादिवशी सुटी असताना सायंकाळी एेनवेळेस स्थलांतराची घाई पतींनी केली. त्यामुळे सामान्य कर्मचाऱ्यांचीही धावपळ उडाली. एका दालनाचे स्थलांतर सायंकाळी झाले. मात्र पशुधन विकास विभागाचे साहित्य, महत्त्वाचे दस्तएेवज बाहेरच पडून होते. पशुधन विकास विभागात एक राजपत्रित अधिकारी तसेच पाच ते सात इतर कर्मचारी कार्यरत आहेत. या विभागांतर्गत तालुक्यातील २० ते २५ पशुवैद्यकीय दवाखान्यांवर नियंत्रण ठेवण्यात येतेे. तसेच विविध शासकीय योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणीही करण्यात येते.
बातम्या आणखी आहेत...