आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॉर्जियन चोरट्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, 1 लाख 9 हजारांचे दागिने लांबवले होते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- शहरातील सराफ बाजारात झालेल्या चोरीप्रकरणी जॉर्जियन चोरटे मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांना देवास येथील कारागृहात ठेवण्यात आले आहे. मध्य प्रदेश येथे दागिने चोरी करून पसार होऊ पाहणाऱ्या या चोरट्यांना राजस्थान-मध्य प्रदेशच्या सीमेवरून अटक करण्यात आली आहे.

शहरातील सराफ बाजारात असलेल्या अरिहंत ज्वेलर्समधून सुमारे लाख हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या काही दिवसांपूर्वी चोरीस गेल्या होत्या. सीसीटीव्ही फुटेज हॉटेलमध्ये चौकशी केल्यानंतर या चोरीत जॉर्जियन चोरट्यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते. तेव्हापासून धुळे पोलिस या चोरट्यांच्या मागावर होते. दरम्यान या चोरट्यांनी मध्य प्रदेशातील देवास येथेही अशाच पद्धतीने चोरी केली. त्यानंतर राजस्थानमध्ये पळ काढताना त्यांना राज्यस्थान मध्य प्रदेश राज्यांच्या सीमेवरून अटक करण्यात आली. सध्या हे चोरटे देवास येथील कारागृहात आहेत. त्यांना घेण्यासाठी धुळे शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी देविदास भोज यांच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक विजय मिस्तरी, सुनील पांढरवट, मोरे देवास येथे गेले आहेत.
या चोरट्यांना धुळ्यातील गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्यासाठी पोलिसांच्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसांत पोलिस पथक या चोरट्यांना घेऊन धुळयात दाखल होईल. त्यासाठी वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जॉर्जियन चोरट्यांनी केवळ धुळे, देवास येथेच नव्हे तर इतर ठिकाणीही चोरी केली आहे. त्यामुळे इतर भागातील पोलिसही या टोळक्याला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. शिवाय या टोळीकडून मोठ्या प्रमाणात सोने जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
तिसरा ठेवायचा लक्ष
सराफबाजारात चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये केवळ दोन चोरटे चित्रीत झाले होते. प्रत्यक्षात मात्र, या चोरट्यांचा तिसरा सहकारीही आहे. तो दुकानाबाहेर थांबून लक्ष ठेवतो. तिघांपैकी वयाची पन्नाशी गाठलेला एक सदस्य या टोळक्याचा म्होरक्या आहे. धुळ्यातील दुकानात हाच म्होरक्या आला होता. या त्रिकुटाला अटक केल्याची माहिती मिळाल्यानंतर तिसऱ्याची गुन्ह्यातील भूमिका समोर आली आहे.
यामुळे करायचे चोरी
प्रदीर्घकाळापासून हे चोरटे भारतात आहे. ऐशआरामात राहण्याच्या सवयीमुळे ते चोरी करायचे. चोरीस गेलेले सोने विक्रीसाठी त्यांना कुणी तरी मदत करत असावे, या दिशेने सध्या पोलिसांचा तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

जॉर्जियन चोरट्यांचा गेल्या काही दिवसांपासून तपास सुरू होता. त्याचबरोबर जाॅर्जियन दूतावास परराष्ट्र खात्यालाही कळवण्यात आले होते. देवास पोलिसही त्यांच्या मागावर होते. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे त्यांना अटक करता येऊ शकली.
चंद्रकांत गवळी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक
बातम्या आणखी आहेत...