आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदीत उघड्यावर शौचास जाणाऱ्या 25 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे : पांझरानदीपात्रात उघड्यावर शाैचास बसलेल्या २५ जणांना सकाळच्या सुमारालाच पाेलिसांनी हिसका दाखवला. त्यांच्यावर कारवाई करण्यात अाली. स्वच्छता अभियानात हे पाऊल उचलण्यात अाले. यापूर्वी नदीपात्रात शाैचास जाणाऱ्यांना गुलाबाची फुले देण्यात अाली हाेती. मात्र, हा प्रकार थांबला नाही. त्यामुळे मंगळवारी पाेलिसांना साेबत घेत मनपाच्या पथकाने माेहीम राबवली. 
 
मनपातर्फे स्वच्छता अभियानात जागृती केली जात अाहे. काेणी कचरा फेकला तरी त्यांना दंड केला जाताे. सफाई कामगारांकडून दररोज स्वच्छता केली जाते. काेणीही उघड्यावर शौचास जाऊ नये यासाठी मंगळवारी महापालिका प्रशासनाने पोलिस बंदोबस्त घेऊन शहरात पांझरा नदीपात्र, मोहाडी परिसर ऐंशी फुटी रस्ता भागात सकाळी सात वाजता कारवाई केली. सकाळी महापालिकेचे पथक पोलिसांनी कारवाई करीत पांझरा नदीपात्रात बसलेल्या मोहाडी भागात अलहेरा हायस्कूल परिसरातील नागरिकांना उघड्यावर बसलेले असताना पोलिसांनी ताब्यात घेतले. 
 
त्यामुळे सकाळी शौचाला गेल्यानंतर थेट पोलिसांच्या कारवाईला सामोरे जात त्यांना पोलिस ठाणे गाठावे लागण्याचा प्रसंग या वेळी ओढवला आहे. यातून अनेकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. पोलिस ठाण्यात आणल्यावर त्यांची नोंद करण्यात आली आहे. तर महापालिका प्रशासनाने प्रत्येकी शंभर रुपये दंड वसूल केला आहे.
 
 या वेळी महापालिकेचे सहायक आयुक्त त्र्यंबक कांबळे, सहायक आरोग्याधिकारी रत्नाकर माळी, स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, लक्ष्मण पाटील, संदीप मोरे, सुरेश महाजन, साईनाथ वाघ पाेलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या वेळी ताब्यात घेतलेल्यांमध्ये सय्यद चांद सय्यद नसीर, जावेद अन्सारी, शब्बीर शेख, सय्यद अब्बास सय्यद इब्राहिम, सय्यद बेग मुसीम, शिवा परदेशी, संतोष भावसार, वासुदेव माळी यांचा समावेश होता. 
बातम्या आणखी आहेत...