आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाज्यांनाही पावसाचा तडाखा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा तडाखा भाज्यांनाही बसला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विविध ठिकाणांहून येणाऱ्या मालाची आवक घटणार असल्याचा अंदाज भाजीविक्रेत्यांनी व्यक्त केला आहे.
दोन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे, त्यातून भाजीपालाही सुटलेला नाही. गेल्या महिनाभरापासून हिवाळी भाज्यांची आवक वाढल्याने भाव आटोक्यात आले होते. त्यातच गेल्या दाेन दिवसांत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाने भाव पुन्हा कडाडण्याची शक्यता आहे. सध्या एरंडोल, अमळनेर, धरणगाव या ठिकाणांहून भाजीपाला जळगावच्या मार्केटमध्ये येतो. अवकाळी पावसामुळे हिरवा भाजीपाला सडण्याच्या मार्गावर आहे तर गवार, भेंडी आणि कांदा या पिकांनाही बाधा पोहोचली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात येणाऱ्या मालावर भाज्यांचे दर निश्चित होणार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी भाज्यांची हाेणारी आवक बघून भावांचे गणित लक्षात येणार असल्याचे भाजीविक्रेत्यांचे म्हणणे आहे.
-भाज्यांची आवक हाेण्यानुसार भाव ठरतील. धरणगाव, एरंडोल येथून येणाऱ्या भाजी मालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. भेंडी, चवळी, गवार, कारले, गिलके, दोडके, भोपळा आणि पालेभाज्यांना पावसाचा फटका बसला आहे. नीलेशमाळी, विक्रेते

कांद्याची पात महागली
दोनदिवसांपूर्वी कांद्याची पात रुपयांत गड्डी मिळत होती. ती आज २० रुपये गड्डीने विकली जात आहे. कोथिंबीर अन्य हिरव्या भाज्याही सडल्याचे चित्र आहे. कांदाही ओला झाल्याने कांद्याचे भाव कडाडण्याची शक्यता आहे. दरम्यान, रविवारी मात्र भाज्यांचे दर स्थिर होते.