आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैन्यात दलितांना अारक्षण द्या; पाकला वठणीवर अाणू : रामदास अाठवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- ‘सैन्य दलात दलितांना अारक्षण द्या. पाकिस्तानला वठणीवर अाणू,’ असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास अाठवले यांनी साेमवारी धुळ्यातील एका कार्यक्रमात केला. विशेष म्हणजे  केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डाॅ. सुभाष भामरे यांच्यासमाेर त्यांनी हे वक्तव्य केले.
धुळे शहरात सामाजिक न्याय विभागातर्फे साेमवारी  दिव्यांगांना तीनचाकी सायकलींसह विविध वस्तूंचे वाटप करण्यात अाले. या कार्यक्रमात अाठवले म्हणाले की, अद्यापही विविध क्षेत्रात अारक्षण मिळालेले नाही. सैन्यातही ते नाही. मुळात डाॅ. बाबासाहेब अांबेडकर यांनीच देशासाठी प्राणार्पण करण्याची शिकवण दिली अाहे. त्यासाठी सैन्यात दलितांना अारक्षण मिळाले पाहिजे.’

या वेळी डाॅ. सुभाष भामरे यांनी मनमाड-इंदूर रेल्वेमार्गावर भूमिका मांडली. या मार्गावरील प्रकल्पाचे येत्या तीन महिन्यांत भूमिपूजन केले जाईल, असेहीत त्यांनी  सांगितले.  ते म्हणाले, ‘हा श्रावणबाळाचा देश अाहे. अाई-वडिलांमध्ये परमेश्वर पाहून सेवा करावी. मात्र अाता परिस्थिती बदलली अाहे. वयाेवृद्धांकडे फारसे काेणी लक्ष देत नाही. त्यासाठी केंद्राकडून ही याेजना लाभदायक ठरणार अाहे. निवडून अाल्यापासून विकासाचा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न करीत अाहेत.  याशिवाय सुलवाडे, जामफळ लिफ्ट याेजनेद्वारे तापीतील पाणी शेतात पाेहाेचवण्यासाठी २ हजार ३६० काेटींचे पॅकेजही मंजूर करण्यात अाले अाहे.’
 
नाेटबंदी वर्षपूर्तीला व्हाईट मनी डे पाळणार- आठवले
 
देशात पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी वर्षभरापूर्वी केलेल्या नाेटबंदीचा निर्णय क्रातीकारी हाेता. त्यामुळे काळ्या धनाला अटकाव झाला. गैरव्यवहारांना अाळा बसला. त्या निर्णयाची वर्षपूर्ती  ८ नाेव्हेंबरला हाेणार अाहे. त्यानिमित्त व्हाईट मनी हे पाळणार अाहाेत, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री रामदास अाठवले यांनी दिली. यानिमित्त प्रत्येक गावात रिपाइंतर्फे डाॅ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या पुतळ्यानजीक पंतप्रधान माेदींचे काैतूक केले जाईल, असेही अाठवले म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...