आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरटीओत सारथी प्रणालीवर होईल ऑनलाइन काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात लवकरच सारथी प्रणाली कार्यान्वित होणार आहे. ही प्रणाली सुरू झाल्यावर नागरिकांना थेट आरटीओ कार्यालयापर्यंत येण्याची गरज नसेल, अशी माहिती आरटीओ कार्यालयातर्फे देण्यात आली अाहे. ही प्रणाली कार्यान्वित करणारे धुळे हे खान्देशातील पहिलेच आरटीओ कार्यालय असेल. प्रणालीसाठी आवश्यक यंत्रणा बसवण्याचे काम सुरू झाले आहे.
वाहन मालकांना थेट आरटीओ कार्यालयापर्यंत येण्याची गरज भासू नये यासाठी आता सर्व कामकाज संगणकीय पद्धतीने होणार आहे. त्याअनुषंगाने यंत्रणा विकसित केली जात आहे. या प्रणालीला सारथी असे संबोधले जाते. या यंत्रणेद्वारे देशभरातील सर्व आरटीओ कार्यालये परस्परांशी जोडले जातील. कार्यसुलभतेसाठी ही यंत्रणा विकसित केली जात आहे. त्यामुळे सर्व कामे जलदगतीने होऊ शकतील. त्यासाठी इंटरनेटचा वेग किमान १० एमबीपीएस असणे अपेक्षित आहे. ही प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी आरटीओ कार्यालयात बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांमार्फत काम सुरू आहे. दोन दिवसांत ही यंत्रणा सुरू होईल, असा अंदाज आहे. यापूर्वी मुंबई, ठाणे, औरंगाबाद येथील आरटीओ कार्यालयात ही यंत्रणा बसवण्यात आली आहे.
खान्देशात अद्याप एकाही आरटीओ कार्यालयात ही यंत्रणा सुरू करण्यात आलेली नाही. ही प्रणाली सुरू झाल्यावर शासकीय संकेतस्थळावर जाऊन नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावा लागेल.

मोजा २८ रुपये अधिक...
ऑनलाइन प्रक्रिया गुंतागुंतीची, जटिल आणि आकलनाला कठीण आहे. शिवाय ऑनलाइन अर्ज, बंॅकेत चलन भरणे त्याची पावती सादर करण्याचा प्रकारही वेळखाऊ असू शकतो. या प्रक्रियेतून केवळ लायसन्स घेण्यासारख्या कामासाठी किमान २८ रुपये अधिकचे मोजावे लागणार आहेत.

पण माहितीचे काय
यंत्रणासुरू झाल्यावर प्रत्यक्षात ऑनलाइन अर्ज भरण्याची पद्धत, त्यासाठी अावश्यक संकेतस्थळ, लागणारा वेळ, तांत्रिक अडचणींवर मार्ग एवढेच काय तर एकूण पद्धती तिचे फायदे नागरिकांपर्यंत पोहाेचावेत, अशी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. तशी सूचना फलकही लावण्यात आलेला नाही.

सेटअपचे काम सुरू
^वरिष्ठ स्तरावरून आदेश आल्यामुळे सारथी प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. सध्या सेटअपचे काम सुरू आहे. साॅफ्टवेअरची माहिती कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे कामे अधिक सुलभ गतिशील होतील. -व्ही.व्ही. लांडे, प्रादेशिक परिवहन कार्यालय
दिव्य मराठी विशेष
बातम्या आणखी आहेत...