आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सनी लिओनविरोधात शिवसेना पोलिस ठाण्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- चित्रपट अभिनेत्री सनी लिओन हिच्या संकेतस्थळावर अनेक अश्लील चित्रफिती आहेत. त्यामुळे तरुणांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत असल्याने तिच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शिवसेनेतर्फे शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक देविदास भोज यांना निवेदन देण्यात आले.
अभिनेत्री सनी लिओन संकेतस्थळावरील चित्रफिती तसेच छायाचित्रांमुळे चर्चेत आहे. याप्रकरणी तिच्या विरोधात मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या अॅड. अपर्णा रामतीर्थकर यांनीही बुलडाणा पोलिसांत तक्रार अर्ज दिला आहे. त्यानंतर शनिवारी शिवसेनेसह समविचारी पक्षांनी शहर पोलिस ठाण्यात सनी लिओन विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याविषयी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कॅनडाची रहिवासी असलेली सनी लिओन हिंदी चित्रपट सृष्टीत दाखल झाली आहे. तिने स्वत:चे अश्लील, विकृत छायाचित्रे तसेच चित्रफिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या आहेत. सनी लिओनच्या संकेतस्थळाला भेट देणाऱ्या तरुणांसह बालकांनी या चित्रफिती बघितल्यावर त्यांच्या मनावर त्याचा वाईट प्रभाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सनी लिओनवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेचे महानगरप्रमुख सतीश महाले यांनी केली आहे. दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती.
- सनी लिओनचे छायाचित्र तसेच चित्रफितीमुळे तरुणांच्या मनावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे तिच्या विरोधात गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे.
सतीश महाले, महानगरप्रमुख,शिवसेना
बातम्या आणखी आहेत...