आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दुर्ग संवर्धन’चे सोनगड किल्ल्यावर श्रमदान, असा अाहे किल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दुर्गसंवर्धन प्रतिष्ठानतर्फे ४८ श्रमदान मोहीम सिन्नर तालुक्यातील सोनेवाडी गावाजवळील सोनगड किल्ल्यावर राबविण्यात अाली. या गडाची अवस्था अत्यंत बिकट झालेली असल्याने ही माेहीम राबविण्यात अाली. 
 
या ठिकाणी वनविभाग अाणि पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष अाहे. गडावर जाण्यासाठी कुठेही दिशादर्शक फलक नाही, पायथ्याजवळ असलेल्या शाळेतील शिक्षक आणि मुले गडावर जाण्याचा रस्ता दाखवितात. प्रतिष्ठानतर्फे या किल्ल्यावर स्वच्छता करून दोन हजार बियांचे रोपण करण्यात आले तसेच किल्ल्यावरील वनस्पती, पक्षी, फुलपाखरे आदींचा अभ्यासदेखील करण्यात आला. वनविभागाने या परिसरात निसर्ग पर्यटन केंद्र सुरू करण्यासाठी संस्थेतर्फे निवेदनदेखील देण्यात येणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आनंद बोरा, पक्षीमित्र चंद्रकांत दुसाने, ज्येष्ठ गिर्यारोहक भीमराव राजोळे, सागर बनकर, आकाश जाधव, आशिष बनकर, समीर ठाकूर, भाऊसाहेब राजोळे आदींसह पायथ्याच्या गावातील युवक सहभागी झाले होते. 
 
असा अाहे किल्ला
हागड निजामाकडून मोगलांकडे आला होता. सोनगडवर १६८२ मध्ये दोरखंडाचा जिना करून मराठा सैन्याने हल्ला केल्याचा उल्लेख आहे. या किल्ल्यावर खंडोबाचे मंदिर आहे. पायथ्याशी दुर्गा तर डावीकडे हनुमान मंदिर आहे. झेनिया, विंचवी, कुसूम, आभाळी, छोटा कल्प, अमरी आदी वनफुलांनी हा किल्ला बहरताे. दाट जंगलात जैवविविधतेने नटलेल्या या किल्ल्यावर अनेक प्रकारची औषधी वनस्पतीदेखील आहेत. किल्ल्यावर दोन खांबी गुहा, पाण्याची टाके अाहे. 
बातम्या आणखी आहेत...