आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sindhi Professionals Encroachment Were Remove From Jail Road

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॉकर्सना वाटली जेलरोडची खिरापत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- आम्हाला जेलरोडवरून उठवले. तो मोकळा केला. आता दुसऱ्या व्यावसायिकांना जागा देत आहेत. आम्हीही पैसे देतो. जेलरोडवर जागा द्या, अशी खुलेआम मागणीच सिंधी व्यावसायिकांनी आयुक्तांकडे केली. न्यायालयीन निकालानंतर मोठ्या खटपटी करून सिंधी व्यावसायिकांचे अतिक्रमण जेलरोडवरून हटवण्यात आले. त्यांना कुठेच जागा दिली नाही. मात्र, फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी आयुक्त डॉ. नामदेव भोसलेंनी चक्क जेलरोड खुला करून दिला. वाढदिवशीच त्यांनी हॉकर्सना जेलरोडची खिरापत वाटल्यामुळे त्यांच्या निर्णयावरून वाद सुरू झाला आहे.
आता पावसाळा निघून जाईल, तोपर्यंत महापालिकेला हॉकर्ससाठी जागा सापडणार नाही. म्हणजे जेलरोड पुन्हा अतिक्रमणाच्या सापळ्यात अडकणार आहे. सोमवारी अचानक सकाळपासून आग्रारोडवरील भाजीपाला फळ विक्रेत्यांना जेलरोडवरील जागा देण्यात आली. खुद्द आयुक्त नामदेव भोसले यांनी जेलरोडवर उभे राहून ही जागा द्यायला मान्यता दिली. जागा सांभाळण्यासाठी फेरीवाल्यांची एकच गर्दी झाली होती.
या ठिकाणी २८७ व्यावसायिकांना जागा देण्यात आली आहे. यासाठी सकाळी सहा वाजेपासून आग्रा रस्त्यावरील नोंदणी केलेल्या व्यावसायिकांनाच जागा देण्यात आली. त्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरिकेट्स लावून हा रस्ता वाहतुकीसाठी थोडा वेळ बंद करण्यात आला होता. त्यानंतर तहसील कार्यालयाकडून ज्या फेरीवाला व्यावसायिकांनी नोंदणी केलेली आहे. त्या यादीच्या क्रमानुसार दोन्ही बाजूला हातगाड्या लावण्यात आल्या. तर येथे काही दिवसांपासून व्यवसाय करणाऱ्यांनीही पर्यायी जागेची मागणी केली. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. नंतर व्यावसायिकांना जागा देण्यात आल्याने सर्वांनी जागा सांभाळून हातगाड्या तेथे लावल्या. भाजीपाला फळ विक्रेत्यांना येथे पहिल्या टप्प्यात जागा देण्यात आली आहे. यात २१६ भाजीपाला व्यावसायिक ७१ फळ विक्रेत्यांचा समावेश आहे.
पाचकंदीलला होईल सोय
शहरातील मुख्य बाजारपेठ असलेले पाचकंदील येथे महापालिकेच्या मालकीचे चार मार्केट आहेत. त्या ठिकाणी नवीन मार्केटचे बांधकाम नियोजित आहे. त्यामुळे या ठिकाणी सर्व प्रकारच्या व्यावसायिकांना सामावून घेता येणार आहे. त्यामुळे या व्यावसायिकांच्या जागेचा प्रश्न कायमचा मिटेल.
पर्यायी जागेसाठी इतर ठिकाणी शोधाची तयारी
आग्रारस्त्यावरील सर्वच व्यावसायिकांना एकाच जागेवर सामावून घेणे शक्य नाही. कारण त्यांचे व्यवसाय वेगवेगळे आहेत. त्यासाठी आता ऊस गल्लीत कापड व्यावसायिक, गल्ली क्रमांक ५च्या बोळीत आईस्क्रीम व्यावसायिक, क्युमाईन क्लबजवळील रस्त्यावर कटलरी व्यवसाय, मोगलाई भागात शाळा क्रमांक १४मध्ये, देवपुरात नवरंग जलकुंभाजवळील जागा, नकाणे रस्ता वाडीभोकर रस्ता या ठिकाणी पर्यायी जागा विविध प्रकारच्या व्यावसायिकांना देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांचे गट तयार केले जाणार आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, शासनाच्या जागा देण्याचा अधिकार आहे का?