आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी प्रवाशांना लवकरच मिळणार ई-तिकीट, सवलतीतील सोयींमध्येही बदल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी आणलेल्या सात आकर्षक योजनांचा विविध वयोगटातील प्रवासी लाभ घेत आहेत. त्यात वार्षिक सवलतीपासून प्रासंगिक करार, आवडेल तेथे प्रवास यासोबतच संगणकीय आरक्षण, इंटरनेट सुविधा आदींचा समावेश आहे.
धुळे विभागातील आगारांमध्ये या सर्व सुविधा उपलब्ध असून, प्रवाशांनी त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी केले आहे. "गाव तेथे रस्ता रस्ता तेथे एसटी' असे राज्य परिवहन महामंडळाचे धोरण आहे. महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खास आकर्षक सुविधा मिळण्याच्या उद्देशाने या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या सर्व याेजनांना प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, वार्षिक सवलत कार्ड योजनेत २०० रुपये असलेल्या कार्डद्वारे प्रवास भाड्यात वर्षभर १० टक्के सवलत प्रवाशांना मिळणार आहे. इतकेच नव्हे तर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या अपघातात मृत्यू झाल्यास नुकसानभरपाई व्यतिरिक्त दीड लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे.
याशिवाय ‘आवडेल तेथे प्रवास’ ही याेजना राज्य आंतरराज्यासाठी उपलब्ध आहे. या योजनेच्या माध्यमातून चार सात दिवसांच्या पासमध्ये प्रवाशांना कोठेही फिरता येते. त्यात प्रवासी तीर्थस्थळे, प्रेक्षणीय स्थळे, परीक्षा, व्यापार आदींसाठी अत्यंत सवलतीत सेवा घेता येत असून, एसटी महामंडळही आता हायटेक होत आहे. त्याचा धुळे विभागातील प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी केले आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, प्रवासासाठी असलेल्या योजना...
बातम्या आणखी आहेत...