आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवास योजनेसाठी सर्वेक्षण, तांत्रिक अहवाल तयार करण्यासाठी नेमला जाणार ठेकेदार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - केंद्र शासनातर्फे पंतप्रधान आवास योजना राबवण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील विविध भागात असलेल्या झोपडपट्ट्या जागांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्याचा तांत्रिक अहवाल तयार करण्यासाठी खासगी कंपनीची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. 
 
झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प शासनाने केला आहे. त्यानुसार झोपडपट्टी निर्मूलन योजनेंतर्गत शहरात एक हजार २०० घरकुले बांधण्यात आली आहेत. त्यानंतर आता केंद्र शासनाने पंतप्रधान आवास योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत ज्यांच्याकडे हक्काचे घर नाही त्यांना स्वस्तात घर उपलब्ध करून दिले जाणार आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांच्या आत आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ही योजना शहरातही राबवण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत शहरात ज्या ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत त्या ठिकाणी सुसज्ज इमारती बांधण्यात येणार आहेत. या ठिकाणी रस्ते, गटारी, पाणीपुरवठा पथदिवे आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. 

मनपाने मागविले होते अर्ज 
महापालिकेनेपंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविले हाेते. त्यानुसार दिलेल्या मुदतीत साडेसहा हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. या प्राप्त अर्जांची छाननी करण्याचे काम महापालिकेची समिती करत आहे. पंतप्रधान आवास योजनेत नवीन घर घेणाऱ्यांना अडीच लाख रुपयांपर्यंत सबसिडी दिली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. 

शहरात ३५ झोपडपट्ट्या 
यायोजनेंतर्गत शहरातील झोपडपट्टीच्या जागेवर घरकुले बांधण्यात येत अाहेत. शहरात सद्य:स्थितीत ३५ घोषित ३५ अनधिकृत झोपडपट्ट्या आहेत. याठिकाणी कशा पद्धतीने घरकुल करता येईल याचा विचार प्रशासनातर्फे सुरू करण्यात आला आहे. पंतप्रधान आवास योजनेत घर घेण्यासाठी शहरातील अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ किती जणांना मिळतो हे भविष्यात स्पष्ट होईल. या योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड कशी होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 
बातम्या आणखी आहेत...