आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून प्रकरणातील संशयितांना पोलिस कोठडी, ‘पी. एल.’च्या ‘भाई’ची चौकशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सराईत गुन्हेगारांच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. सातपूर येथील पी. एल. ग्रुपच्या कार्यालयात सराईत गुन्हेगार अर्जुन आव्हाड, निखिल गवळी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. पी. एल. ग्रुपच्या फरार सदस्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार अर्जुन आव्हाड निखिल गवळी या दोघांच्या खूनप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सनी ऊर्फ ललित विठ्ठलकर निखिल निकुंभ या दोघांना सिडको परिसरात अटक केली. या गुन्ह्यातील मुख्य संशयित प्रिन्स सिंग वतन पवार हे दोघे फरार होते. शनिवारी रात्री सिडको परिसरात या दोघांना पथकाने जेरबंद केले. ३१ डिसेंबरला मृत आणि संशयितांमध्ये पार्टीत नाचण्यावरून वाद झाला होता. सातपूर येथील पी. एल. ग्रुपच्या कार्यालयात ताे मिटविण्यात आला होता. मात्र, मृतांनी ‘उद्याचा सूर्य तुम्ही पाहणार नाही’, अशी धमकी दिल्याने संशयितांच्या मनात राग होता. रात्री कार्यालयात झोपलेल्या या दोघांवर जवळून गोळ्या झाडण्यात आल्या त्यांचे मृतदेह फोर्ड कारमधून नेत तोरंगण घाटात फेकून देण्यात आले. थंडीचे दिवस असल्याने दोघांचे मृतदेह काही प्रमाणात शाबूत राहिले. आव्हाडच्या खिशात मिळालेल्या ओळखपत्रावरून त्याची गवळीची ओळख पटवण्यास पोलिसांना यश आले. दोघेही पी. एल. ग्रुपचे सक्रिय सदस्य असल्याचे पोलिसांनी सांगितले. या ग्रुपच्या ‘भाई’चीदेखील पोलिस चौकशी करीत आहेत. पोलिस निरीक्षक किशोर नवले, उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.

कार नेमकी कुणाची?
सातपूरयेथील पी. एल. ग्रुपच्या टाेळीतील गुंडांकडून पाेलिसांनी जप्त केलेली फाेर्ड कार प्रथमदर्शनी नाशिकराेड येथील एका व्यावसायिकाने दुसऱ्या एका व्यावसाियकाला विकली असल्याचे उघडकीस अाले असून, सद्यस्थितीत या कारचा नेमका मालक काेण, याचा पाेलिस शाेध घेत अाहेत. याबाबत साेमवारी नेमके चित्र स्पष्ट हाेणार असल्याचे तपासी पथकाने सांगितले.