आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बहिणीच्या लग्नापूर्वीच भावाची आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - बहिणीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी रविवारी बाजार समितीमागील स्वामिनारायण सोसायटीत राहणार्‍या सागर साहेबराव चौधरी (16) याने बाळापूरच्या शेतविहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

सागर रविवार सकाळपासून बेपत्ता होता. सर्वत्र शोध घेऊनही तो सापडला नाही. दुपारी 12 वाजेच्या सुमारास बाळापूर गावाच्या शिवारातील मोतीलाल चौधरी यांच्या शेतविहिरीत त्याचा मृतदेह सापडला. सागरला त्याच्या वडिलांनी धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणी करून डॉ. र्शद्धा सूर्यवंशी यांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत धुळे तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बहिणीच्या लग्नात महागडा ड्रेस घेण्यावरून त्याचा वाद झाला होता. याच वादातून तो घराबाहेर पडल्याचे पोलिसांनी सांगितले.