आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमान घसरल्याने दिवसभर जाणवताे गारठा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरात थंडीची हुडहुडी वाढली अाहे. गेल्या अाठवडाभरात तापमानात चार अंशांची घसरण झाल्यामुळे दिवसभरात अाता गारठा जाणवताे. यातून उबदार वस्त्रांची मागणी वाढत अाहे. थंडीची लहर वाढली अाहे. त्यामुळे सर्दी, पडशासारख्या अाजारांचे प्रमाणही वाढले अाहे. साेमवारी वातावरणात दिवसभर गारठा जाणवला.

शहरात यंदा थंडीचे प्रमाण उशिराच वाढताना दिसत अाहे. नाेव्हेंबरमध्ये थंडी जाणवली नाही. मात्र नाेव्हेंबरच्या शेवटच्या अाठवड्यात थंडीच्या प्रमाणात वाढ झाली. गेल्या तीन ते चार दिवसांत तापमान वेगाने घसरले अाहे. दिवसा ३४ अंशांवर असलेले तापमान साेमवारी २९.६ अंशांवर अाले. तर रात्रीचे तापमान ११.२ अंशांवर घसरले. परिणामी थंडी बऱ्यापैकी जाणवत अाहे. पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे यंदा थंडीही उशिरानेच दाखल झाली. सध्या गुलाबी स्वरूपाची थंडी जाणवत अाहे. मात्र, त्यातही हुडहुडी भरते. सकाळी सूर्याची किरणे उशिरानेच पडतात. सात वाजेनंतर सूर्य उगवत असला तरी थंडीमुळे उन्हाचे प्रमाण फारसे जाणवत नाही.
बातम्या आणखी आहेत...