आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिंदेंना मानवभूषण, तर पाटील यांना शिक्षणरत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- होटगी रोड परिसरातील श्री सिद्धेश्वर सर्व सेवा संघाच्या वतीने यंदा माजी केद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना मानवभूषण तर ए. जी. पाटील यांना शिक्षणरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा सोहळा जून रोजी सायंकाळी वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे होणार असल्याची माहिती एन. बी. शरणार्थी यांनी दिली आहे.
काशीपीठाचे जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य यांची प्रमुख उपस्थिती तर अध्यक्षस्थान माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी भूषवणार आहेत. या कार्यक्रमात बाबा मिस्त्री (आदर्श वैद्यकीय समाजकार्य), शोभा नष्टे (समाजसेविका), सिद्धराया दुलंगे (सहकार भूषण), मन्मथ उकरंडे (आदर्श मुख्याध्यापक), नीलिमा नारायणकर (आदर्श प्राध्यापिका), शरीफ सय्यद (आदर्श पत्रकार), बापूसाहेब माळी (आदर्श शेतकरी) यांचाही गौरव केला जाणार आहे.
शरणार्थी यांच्या ग्रंथांचे होणार प्रकाशन
क्रांतिकारकमहात्मा बसवेश्वर आणि १२ वे शतक महिलांचा सुवर्णकाळ या एन. बी. शरणार्थी लिखित ग्रंथांचे प्रकाशन कार्यक्रमात होईल. कार्यक्रमास काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्ज्वला शिंदे, महापौर सुशीला आबुटे, आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...