आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलसाठा महिन्याभरात चार टक्क्यांनी घटला, प्रकल्पातील पाण्याचे वेगाने होतेय बाष्पीभवन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- जिल्ह्यात गत महिन्यापासून तापमानाचा पारा ४० अंशांच्या वर पोहोचला आहे. सूर्य आग ओकत असताना त्याचा परिणाम जसा जनजीवनावर होत आहे. तसाच तो जलसाठ्यांवरही होत आहे. जिल्ह्यातील लघू, मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यांत महिन्याभराच्या काळात चार ते पाच टक्के घट झाली आहे. मात्र, किती लिटर पाण्याचे उन्हामुळे बाष्पीभवन झाले हे मोजण्यासाठी जिल्ह्यात कोणतीही यंत्रणा किंवा त्याबाबतची माहिती घेतली जात नसल्याची बाब पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या माहितीतून पुढे आली आहे.
यंदा जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली आहे. त्यात मागील तीन महिन्यांत गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला. सरासरी इतक्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख जलप्रकल्पांमध्ये मुबलक जलसाठा निर्माण झाला आहे. जलसाठ्यांची नोंद दररोज पाटबंधारे विभागाकडून घेतली जाते. त्यानुसार जिल्ह्यातील सात ते आठ प्रमुख जलप्रकल्पांत गेल्या महिन्याभरात चार ते पाच टक्के जलसाठा कमी झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. प्रामुख्याने गेल्या महिन्याभरापासून तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून, त्याचा फटका जलसाठ्यांना बसत आहे.
जलसाठ्यांत मुबलक पाणीसाठा असला तरी अजून किमान दीड ते दोन महिने उन्हाचा तडाखा जिल्ह्यात राहण्याची शक्यता असल्याने जलसाठे कमी होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. मोठ्या प्रकल्पांच्या ठिकाणी उष्णतेमुळे किती टक्के पाण्याचे दिवसभरात बाष्पीभवन होते याची नोद घेण्यासाठी यंत्रणा बसवलेली असते. मात्र, जिल्ह्यात सर्वच प्रकल्प हे लघू, मध्यम स्वरूपाचे असल्याने त्या ठिकाणी अशा प्रकारची कोणतीही यंत्रणा बसवलेली नसल्याने त्याबाबत कोणत्याही प्रकारची नोंद घेण्यात येत नसल्याचे पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या माहितीवरून उघड झाले आहे.
त्यामुळे नेमके किती लाख लिटर पाण्याचे बाष्पीभवन होऊन जलसाठा कमी झाला यांचा अंदाज कोणीही बांधू शकत नाही. जलसाठ्यात पाच टक्के घट झाली असली तरी अजूनही मुबलक जलसाठा असल्याने यंदा जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या जाणवणार नसल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.
पाणी सोडणार
काही दिवसापूर्वीच अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडण्याचे निर्देश पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. त्यामुळे पांझरा नदी काठावरील गावांना या पाण्याचा फायदा होणार असून पाणीटंचाईचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
प्रकल्पनिहाय जलसाठा
६.५१ टक्के
कनोली
१०.६२ टक्के
बुराई
४२.११ टक्के
करवंद
३६.१२ टक्के
लाटीपाडा
३७.३३ टक्के
मालणगाव
४६.११ टक्के
जामखेली
६७.९१ टक्के
अनेर
१९.३६ टक्के
सोनवद
८०.३० टक्के
सुलवाडे
अक्कलपाड्यात क्षमतेच्या निम्मे जलसाठा
धुळेसाक्री तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या अक्कलपाडा प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या जलप्रकल्पात १२०० दलघफू जलसाठा होऊ शकतो. मात्र, सद्य:स्थितीत प्रकल्पात क्षमतेच्या निम्माच जलसाठा उपलब्ध आहे. त्यापैकी खरीप हंगामासाठी ३०० दलघफू जलसाठा तातडीने पांझरेत सोडण्याबाबत महाराष्ट्रदिनी पालकमंत्री दादा भुसे यांनी आदेश दिले आहे. त्यामुळे पांझरेत पाणी सोडण्यात आल्यास या जलसाठ्यात अजून घट होणार आहे. मात्र, या ठिकाणीही बाष्पीभवनाबाबतची यंत्रणा बसविली गेलेली नाही.
धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाणे तलावात उपलब्ध असलेला जलसाठा. हा साठा पावसाळ्यापर्यंत पुरेल असा दावा महापालिकेने केला आहे.
बातम्या आणखी आहेत...