आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वळवाचा तडाखा: तारा तुटल्याने आठ तास वीज खंडित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- शहरात बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने पंधरा ते वीस मिनिटे जोरदार हजेरी लावली. अचानक झालेल्या पावसामुळे शहरातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. वादळामुळे काही घरांची पत्रे उडाली. तर काही ठिकाणी वृक्षांसह फांद्या तुटून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. पावसाचे वातावरण पाहून दुपारी चार वाजेपासून वीजपुरवठा खंडित होता. तो रात्री उशिरापर्यंत कायम होता. त्यामुळे शहर अंधारात होते.
शहरात बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यामुळे उन्हाचा चटका जाणवत नव्हता. दुपारनंतर ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढ होऊन अंगातून घामाच्या धारा निघत होत्या. त्यामुळे तापमानाचा पारा कमी झाला. दुपारी चार वाजेपासून जोरदार वारे वाहायला सुरुवात झाली. या वाऱ्यामुळे शहरात सर्वत्र धुळीचे साम्राज्य तयार झाले होते. रस्त्यावरील वाहनचालकांना धुळीचा त्रास जाणवत होता. चार वाजेला काही ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची उकाड्यापासून काहीशी सुटका झाली. साडेचारनंतर मात्र वातावरण एकदम बदलले. अचानक जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली. सायंकाळची वेळ असल्याने बाजारपेठेतही काही प्रमाणावर गर्दी होती. तसेच कार्यालयातून घरी जाणारेही पावसात सापडले. जोरदार वारा वाहत असताना आकाशातही मोठ्या प्रमाणावर काळे ढग गोळा झाल्याने जोरदार पाऊस पडेल असे वाटत असताना दहा मिनिटांनंतर पावसाने विश्रांती घेतली. तर सायंकाळीही अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू होती.
मात्र, जोरदार वाऱ्यामुळे श्रमिक वसाहतीतील अनेक घरांचे पत्रे, त्यावर ठेवलेल्या वस्तू उडाल्या. तर काही ठिकाणी पत्र्यावर झाडाच्या फांद्या पडल्याने नुकसान झाले. रस्त्यावरही वाऱ्यामुळे उडून आलेला पालापाचोळा साचला होता. दहा मिनिटांसाठी आलेल्या पावसामुळे सर्वच रस्ते ओले झाले तर काही ठिकाणी पाणीही साचले.

कॉलन्या अंधारात
यापावसामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले. शहरातील पंचायत समिती परिसरात झाड पडल्याने वीजतारा तुटल्यामुळे देवपूर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. तसेच पॉवर हाऊस सबस्टेशनमध्येही तांत्रिक बिघाडामुळे सायंकाळी संतोषीमाता चौकापासून ८० फुटी रस्त्यापर्यंतच्या परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. वाजेच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने प्रशासकीय कार्यालयांमध्येही गैरसोय झाली.
परिसरात खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले होते. पावसाळयापूर्वी वृक्षाच्या फांद्या छाटल्या गेल्या नाहीत. त्यामुळे या फांद्यांचा अडसर वीजतारांना झाला. दुपारी वाजेपासून बाजारपेठेतील वीजही बंद करण्यात आली. ती रात्री दहा वाजेपर्यंत बंदच होती. त्यामुळे बाजारपेठेतील व्यवहारही मंदावले होते. पावसाचे कारण सांगून वीजेचा पुरवठा बंद ठेवण्यात आला. त्यामुळे अत्याावश्यक ठरणाऱ्या कामांवर परिणाम झाला. जनरेटरवर काही कामे करावी लागली. नागरिकांना याचा त्रास झाला. आठ ते दहा तास वीज पुरवठा खंडित होता. कॉलनी परिसरात त्यापेक्षाही जास्त काळ वीजपुरवठा खंडित असल्याच्या तक्रारी येत होत्या.
दुपारनंतर शहरात धुळीचे लोळ
शहरातदुपारी वाजेनंतर जोरदार वारे सुरू झाले. वाऱ्यांनी परिसरातील धूळ वाहून आणायला सुरुवात केल्याने रस्तेही धुळीने माखले होते. वाहनधारकांना पुढील बाजू दिसत नव्हती. झाडांची पाने आिण प्लास्टिकच्या पिशव्यांचा खच जमा होत होता. धुळीचे हे वादळ तब्बल अर्धा तास सुरू होते. पाच वाजेपर्यंत वाऱ्याचा वेग कमी झाला. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली; परंतु वादळामुळे आलेल्या धुळीने बरेच नुकसान केले होते. बाजारपेठेत पसरलेल्या धुळीमुळे अन्नपदार्थ खराब झाले. वादळ गेल्यानंतर अनेकांना ओटे तसेच अंगण झाडून काढावे लागत होते. पावसामुळे काही प्रमाणात धूळ दडपली गेली. पाऊस सुरू असतानाही काही प्रमाणात वाऱ्याचा वेग जोरात होता. या पावसामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला; परंतु त्यापूर्वी लहान किरकोळ व्यावसायिकांना त्याचा फटका बसला.
पुढील स्लाइडसवर क्लिक करून वाचा, वादळामुळे मुळासकट झाडे उन्मळून पडले...
बातम्या आणखी आहेत...