आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेचा प्रामाणिकपणा; सोन्याची पोत केली परत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे : येथील मनपाच्या वसुली विभागातील शिपाई विमलबाई खैरनार यांना महिलांच्या प्रसाधनगृहात पन्नास हजार रुपये किमतीची सोन्याची पाेत मिळाली. ती चौकशी करून त्यांनी योग्य महिलेच्या स्वाधीन केली आहे. 
 
एकदा हरवलेली वस्तू सहसा परत मिळत नाही. त्यातही पैसे, सोन्याचे दागिने हरवल्यावर परत मिळण्याची अपेक्षाच अाजच्या काळात कुणी ठेवत नाही. मात्र, या काळातही प्रामाणिकपणा जपणारे नागरिक आहेत. त्यांच्यासारख्या नागरिकांच्या प्रामाणिकपणामुळेच आजही प्रामाणिकतेवर विश्वास ठेवावा लागत आहे. 
 
महापालिकेत महिलांसाठी प्रसाधनगृह बांधण्यात आले आहे. या ठिकाणी प्रकल्प विभागातील समन्वयक पदावर काम करणाऱ्या छाया पाटील या दिवाळीच्या दिवसात लक्ष्मीपूजनाच्या दोन ते तीन दिवस अगोदर नेहमीप्रमाणे गेल्या होत्या.
 
त्यानंतर त्यांच्या गळयातील पन्नास हजार रुपये किमतीची सोन्याची पोत नसल्याचे लक्षात आले. पोत नेमकी कुठे पडली याचा त्यांना अंदाज आला नाही. त्याचवेळी वसुली विभागात कार्यरत असलेल्या विमलबाई खैरनार या प्रसाधनगृहात गेल्यावर बेसीनजवळ सोन्याची पोत आढळून आली.
 
 त्यांनी ती स्वत:जवळ ठेवून घेतली. याची वाच्यता कुठेही केली नाही. काही दिवसानंतर महापालिकेतीलच महिलेची पोत हरवल्याची चर्चा त्यांना कर्णोपकर्णी कळाली. त्यांनी यासंदर्भात छाया पाटील यांच्याशी चर्चा करून पोत केव्हा गहाळ झाली, 
 
त्यांचीच आहे का याची खात्री केल्यावर छाया पाटील यांना त्यांनी त्यांच्या थेट घरी नेऊन सोन्याची पोत त्यांच्या हवाली केली. आयुक्तांच्याही कानी ही वार्ता गेल्याने विमलबाई खैरनार यांचा महासभेत सत्कार करण्यात येणार आहे. 
 
दीड महिन्यांचा कालावधी 
तब्बलदीड महिन्यानंतर योग्य व्यक्तीला त्याची वस्तू परत केल्याचे समाधान या वेळी विमलबाई खैरनारांसह त्यांच्या परिवाराला मिळाले आहे. पोत मिळाल्यावर ती योग्य व्यक्तीला देण्याचा निर्धार विमलबाई त्यांच्या परिवाराने केला होता. अशा प्रकारे महिन्या भरानंतरही सोन्याची पोत परत मिळण्याचे प्रसंग दुर्मीळच आहे. 
बातम्या आणखी आहेत...