आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांचा सराफाला गंडा, सराफ बाजारात दुसऱ्यांदा चोरी; सोन्याचा हार लांबवला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जॉर्जियन चोरट्यांनी दागिने लांबवण्याची घटना ताजी असताना सराफ बाजारातील दीपक ज्वेलर्समधून दोन महिला एका पुरुषाने शनिवारी पुन्हा दागिने लंपास केले. तिघा चोरट्यांची हातसफाई सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हे चोरटे उत्तर भारतीय असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. याप्रकरणी आझादनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील सराफ बाजारातील दीपक ज्वेलर्समध्ये शनिवारी दोन महिला एक पुरुष ग्राहक बनून आले. त्यांनी सोन्याचा हार दाखवण्यास सांगितले. दुकानदाराने इतर ग्राहकांप्रमाणे त्यांच्यासमोर सोन्याचे हार ठेवले. दुकानातील गर्दी आणि विक्रेत्यांची नजर चोरून या तिघांनी सोन्याचा हार लांबवला. हा प्रकार दुकानदाराच्या लक्षात येण्यापूर्वी चोरटे पसार झाले होते ; परंतु तिघा चोरट्यांचा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्याने िटपला. दुकानदाराने सीसीटीव्हीचे फुटेज तपासल्यावर कोणी कशी चोरी केली हे स्पष्टे झाले आहे. यानंतर पेालिसांना घटनेची माहिती देण्यात आली. चोरीस गेलेल्या सोन्याच्या हाराचे वजन ४८.५३० ग्रॅम असून, पोलिसांनी त्याची किंमत एक लाख २० हजार रुपये आकारली आहे. हे चोरटे उत्तर भारतीय असावेत, असा अंदाज त्यांच्या पेहरावावरून व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी दुकान मालक हितेश सुरेश सोनी (३१) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आझादनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादिंव कलम ३७९, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक देविदास शेळके या घटनेचा तपास करीत आहेत.
अशी झाली चोरी..
ज्यामहिलांनी चोरी केली त्या पंजाबी ड्रेसमध्ये आणि शरीराने स्थूल होत्या. त्यापैकी एक महिला दागिने पाहण्याचे सोंग करत असताना दुसऱ्या महिलेने तिच्या मागून येऊन चॉकलेटी रंगाचा सोन्याचा हार असलेला बॉक्स ओढणीखाली लपवल्याचे दृश्य सीसीटीव्हीने टिपले आहे.
चोरांची सेम स्टाइल
दीपक ज्वेलर्समधील देशी अरिहंत ज्वेलर्समधील विदेशी चोरट्यांची कार्यपद्धती बऱ्यापैकी सारखी आहे. दोघा घटनांमधील चोरटे ग्राहक बनून आले झाले. शिवाय दोघा घटनांमधील चोरट्यांनी िवक्रेत्यांचे लक्ष विचलित होताच हातचलाखीने दागिने लांबविले.
बातम्या आणखी आहेत...