आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पित्याच्या मृत्यूनंतर मुलीची आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- आब्बासे मिलना हे, उनके पास जाना है, असा गेल्या काही दिवसांपासून सतत तगादा लावणाऱ्या नीलोफर शेख या तरुणीने सोमवारी गळफास लावून घेत आत्महत्या केली. वडिलांच्या मृत्यूनंतर मुलीने आत्महत्या केल्याची गेल्या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी तेजल जगतापनेे याच पद्धतीने जीवनयात्रा संपविली होती.
मोगलाई परिसरातील ड्रायव्हर गल्लीत राहणारी नीलोफर शेख अहमद (१८) दुपारी घरी एकटीच होती. आई कामानिमित्त घराबाहेर गेली असल्यामुळे तिने छताच्या पंख्याला ओढणीने गळफास लावून घेतला. यानंतर पायाखाली घेतलेला डबाही तिने पाडला होता. दुपारी तिचा लहान भाऊ घरी आला असता हा प्रकार समोर आला. यानंतर त्याच्या ओरडण्याचा आवाज एेकून परिसरातील नागरिक एकत्र आले. तोपर्यंत धुळे शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी विजय मिस्त्री, उपनिरीक्षक योगिता ठाकरे कर्मचारी दाखल झाले होते. नीलोफर हिच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे.
तेव्हापासून ती फारशी कोणाशी बोलत नसे. गेल्या काही दिवसांपासून वडिलांना भेटायचे आहे, त्यांच्याकडे जायचे आहे, असे सतत सांगत होती. याबद्दल कुटुंबीय शेजाऱ्यांनी तिची समजूतही काढली होती. इतपत माहिती तिच्या शेजाऱ्यांनी पोलिसांनी दिली आहे. या घटनेप्रकरणी धुळे शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात िपंपळनेर येथील नाना चौकात राहणाऱ्या तेजल जगताप या मुलीने अशाच पद्धतीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. वडिलांच्या मृत्यूच्या दु:खातून तिने असे केल्याचे चौकशीतून समोर आले होते.
असा हा दुर्दैवी योगायोग
तेजलप्रमाणे नीलोफरच्या कुटुंबाची परिस्थिती बेताची आहे. दोघीही अकरावीची परीक्षा देऊन बारावीला गेल्या होत्या. तेजल नीलोफरच्या आत्महत्येचा प्रकार सर्वप्रथम त्यांच्या लहान भावाच्या लक्षात आला होता. शिवाय या दोन्ही घटना सोमवारी एकाच वेळी घडल्या.
मी जाते कामाला
कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी नीलोफरची आई सईदाबी यांना काम करावे लागत होते. आई सईदाबी यांना नीलोफर जाऊ देत नसे. तू घरी थांब, मी शिकले आहे. कामाला जाते असे ती वारंवार सांगायची, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...