आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Youth And Girls Suicide Issue At Jalgaon, Divya Marathi

युवक-युवतीची शहरात आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - समतानगरातील 19 वर्षीय युवकाने तर कांचननगरात राहणार्‍या 16 वर्षीय युवतीने बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. समतानगरातील पवन भागवत शिरसाठ (वय 19) याने दुपारी 2.45 वाजता घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पवनच्या आत्महत्येचे कारणसमोर आलेले नाही. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

करिश्मा विद्यानिकेतन शाळेची विद्यार्थींनी
कांचननगर येथील करिश्मा रवींद्र सोनवणे (वय 16) हिने दुपारी घरी कुणी नसताना पत्र्याच्या छताला असलेल्या लोखंडी रॉडला ओढणी बांधून गळफास घेतला. दुपारी 3 वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. करिश्मा ही विद्यानिकेतन शाळेतील नवव्या वर्गात शिक्षण घेत होती. तिला एक विवाहित तर एक लहान भाऊ आहे. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.