आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगणक टायपिंग परीक्षार्थींसाठी यू-ट्यूबवर व्हिडिओ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या शासकीय संगणकीय टायपिंग प्रमाणपत्र परीक्षेचा डेमो प्रथमच यू-ट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे. महाराष्ट्र गोव्यातील परीक्षार्थींसाठी संगणक टंकलेखन संस्थेच्या प्राचार्यांनी हा व्हिडिओ डाऊनलोड करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, अशी सूचना परीक्षा परिषदेने केली अाहे. 
 
टंकलेखन मशीन कालबाह्य झाले असले तरी संगणकावर टायपिंग परीक्षा घेण्यात येऊ लागली आहे. पुणे येथील राज्य परीक्षा परिषदेतर्फे ही परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेचे स्वरूप, वेळ तसेच इतर सूचनांबाबत परीक्षार्थींना माहिती असणे गरजेचे आहे.
 
शिवाय लवकर ४० शब्द प्रतिमिनिटांची शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा होणार आहे. परीक्षार्थींना नियमावली प्रश्नपत्रिकेच्या आराखड्याची माहिती व्हावी त्यासाठी यंदापासून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षेचा डेमो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. 
 
सुमारे २० मिनिटे आणि ४० सेकंदांच्या या व्हिडिओची साइज ही २५ एम.बी. एवढी आहे. याशिवाय राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर या डेमोची लिंक देण्यात आली आहे. सर्व शासनमान्य संगणक टंकलेखन संस्थांचे प्राचार्य संस्थाचालकांनी हा व्हिडिओ डाऊनलोड करून विद्यार्थ्यांना दाखवावा, अशी सूचना करण्यात आली आहे. तशा आशयाचे पत्र शिक्षणाधिकारी विभागाला देण्यात आले आहे.
 
त्यावर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांची स्वाक्षरी आहे. दरम्यान, परीक्षेचा व्हिडिओ यू-ट्यूबवर अपलोड केल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेचे स्वरूप कसे असते याची माहिती मिळणे सोपे होणाार आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. 
परीक्षार्थींना होईल लाभ 
- परीक्षार्थींना टंकलेखन परीक्षेचे आकलन व्हावे, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने तशी सूचना केली आहे. विभागीय शिक्षण संचालकांमार्फत सर्व शिक्षणाधिकारी कार्यालयांनाही तसे पत्र पाठविण्यात आले आहे. त्यामुळे शहर परिसरातील संगणक टंकलेखन संस्थाचालक प्राचार्यांनी याचा उपयोग करणे गरजेचे आहे.
 -प्रवीण पाटील, 
माध्यमिक शिक्षणाधिकारी विद्यार्थ्यांना होणार फायदा 
शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षेतील काही परीक्षार्थींची ते १३ जानेवारीदरम्यान परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने यू-ट्यूबवर व्हिडिओ अपलोड करण्याच्या निर्णयाचा निश्चितच परीक्षार्थींना उपयोग होणार असल्याची स्थिती आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद प्रशासनाने परीक्षेविषयी टंकलेखन संस्थाचालकांना माहिती कळवली आहे. 
बातम्या आणखी आहेत...