आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनाचा उद्देश शाेधण्यासाठी जगभर पदभ्रमंती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - मनुष्याचा जन्माचा उद्देश काेणता आहे तसेच बाहेरील व्यक्तींविषयी वाटणारी भीती कमी करण्यासाठी डॅनियल लिम नावाच्या ३३ वर्षीय तरुणाने पदभ्रमंती करत जग पालथे घालण्याचा निर्धार केला आहे. आपले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी या तरुणाने ११ महिन्यांपूर्वी सिंगापुरातून पदयात्रा सुरू केली असून ताे नुकताच पुणे शहरात आला हाेता. ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयास भेट देऊन त्याने आपल्या प्रवासाबाबतच्या रंजक मनमाेकळ्या गप्पा मारल्या.

किरकाेळ शरीरयष्टी असलेल्या डॅनियलने सिंगापूरपासून १२ जुलै २०१४ राेजी प्रवास सुरू केला. मलेशिया, थायलंड, म्यानमार, नेपाळमार्गे सध्या तो भारतात आलेला आहे. आतापर्यंत त्याने सुमारे सहा हजार पाचशे किलाेमीटरचा टप्पा पादाक्रांत केला आहे. या प्रवासात त्याला वेगवेगळ्या देशांतील संस्कृती, भाषा, लाेक जवळून अनुभवता आले. अनेक प्रकारचे चांगले- वाईट अनुभव प्रवासादरम्यान अनुभवले. याबाबत ताे म्हणाला की, ‘मी मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने जवळ जास्त पैसे नसतानाही केवळ एक बॅग व तंबू घेऊन मी प्रवासासाठी निघालाे. दरराेज सरासरी ४० किलाेमीटर प्रवास करून, जे अन्न उपलब्ध हाेईल ते खाऊन अन् जिथे जागा मिळेल तिथे झाेपून मी माझा प्रवास करत आहे. कुटुंबीय, मित्र तसेच काही वाटेत भेटणारे लाेक यांच्याकडून मला आर्थिक मदत िमळते.

या प्रवासादरम्यान नेपाळमध्ये आलेला प्रलयंकारी भूकंप व त्यामुळे झालेली हानी पाहून सुन्न झालाे. पुण्यामधून ताे आता मुंबईला रवाना झाला आहे. त्यानंतर दुबई, आेमान, इराण या
देशांत जाणार असून पुढील दाेन वर्षे ताे भ्रमंती करणार आहे.

डॅनियलचे पुण्याशी नाते
मागील वर्षी पुण्यातील सतीश पाटील, महेश प्रभुदेसाई यांच्यासह आठ तरुण सिंगापुरात माेटारसायकलवर गेले हाेते. दरम्यान, त्यांना म्यानमार येथे वाटेत एका जंगलात डॅनियल हा एकटा चालत जाताना दिसला. त्यांनी विचारपूस केली तेव्हा डॅनियल जगभ्रमंतीवर जात असल्याचे समजले. या पुणेकर युवकांनी त्यास भारतात आल्यानंतर पुण्यात येण्याचे आमंत्रण दिले हाेते. त्यानुसार डॅनियल पुण्यात दाखल झाला व त्याने सिंहगड किल्ल्यावर जाऊन प्रथमच आयुष्यात किल्ला पहिल्याचा सुखद अनुभवही नमूद केला.

स्मशानभूमीत झाेपण्याचा विलक्षण अनुभव
डॅनियलने सांगितले की, ‘प्रवासात काही वाईट अनुभवही आले. आसाम-पश्चिम बंगाल राज्याच्या सीमेवर एका कुत्र्याने चावा घेतल्याने मला काही काळ आैषधाेपचार घ्यावे लागले, तर मध्य प्रदेश येथे रात्रीच्या वेळी मी एका ठिकाणी तंबू टाकून झाेपत असताना काही जण तिथे आले व त्यांनी मला तिथे झाेपू दिले नाही. मी याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता, सदर जागेत एक तासापूर्वीच प्रेत पुरल्याचे सांगण्यात आले, तेव्हा अंगावर शहारे आले हाेते.’
बातम्या आणखी आहेत...