आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • pune rocked by serial bomb blasts high alert in maharashtra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : पुणे स्फोटातील संशयित दयानंद पाटलांच्या बायकोची कसून चौकशी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुण्यातील गजबजलेल्या जंगली महाराज रोडवर बुधवारी रात्री 48 मिनिटांमध्ये कमी तीव्रतेचे चार स्फोट झाले. याशिवाय एका ठिकाणी स्फोटके निकामी करण्यात आली. लागोपाठ झालेले सगळे स्फोट रात्री 7.27 ते 8.15 वाजेच्या दरम्यान झाले. यात एक जण जखमी झाला आहे. स्‍फोटांमध्‍ये जखमी झालेल्‍या दयानंद पाटील यांना ससून रुग्‍णालयात नेण्‍यात आले. तिथे त्‍यांच्‍या विविध तपासण्‍या करण्‍यात आल्‍या. पाटील यांच्‍याकडे एक संशयित म्‍हणूनही पाहण्‍यात येत आहे. त्‍यांची चौकशी करण्‍यात येत आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळी पाटील यांच्या बायकोला ताब्यात घेतले असून, तिच्याकडून दयानंदबाबत माहिती घेऊ चौकशी केली जात आहे. तसेच बालगंधर्व चौकात अण्णा हजारे यांच्या 'इंडिया अगेन्स्ट करप्शन' या संघटनेच्या सुरु असलेल्या उपोषणाची जागा बदलावी, असे निर्देश पुणे पोलिसांनी दिले आहेत.
दरम्यान, या स्फोटात वापरण्यात आलेल्या दोन सायकलींची खरेदी पुण्याच्या कसबा पेठेतून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. कसबा पेठेतील सोनी सायकल ट्रेडींग कंपनीतून या सायकल विकत घेण्यात आल्या होत्या.
पुणे स्फोटाचा तपास जखमी दयानंद पाटील भोवतीच फिरत आहे. पाटीलसंबंधीत ६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. यात त्याची पत्नी सत्यशीला हिचाही समावेश आहे. पाटील जॉर्डनलाही जाऊन आल्याचे तपासात स्पष्ट झाले असून, एक टेलर जॉर्डनला कशासाठी गेला होता या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. सुरक्षेच्या कारणामुळे अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.
का घडविला पुण्यात स्फोट?, कोणती आहेत कारणे व शक्यता...
पुणे : स्फोट नियोजित व संघटित कृत्य- केंद्रीय गृहसचिव
PHOTOS : चाळीस मिनिटांत झाले चार स्फोट