आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यात अभियांत्रिकीच्या दीड लाख जागा उपलब्ध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - राज्यातील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यंदा १ लाख ५७ हजार जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी तीन फेर्‍यांमध्ये प्रवेश प्रक्रिया होणार आहे. दोन फेर्‍या गुणवत्ता यादीनुसार, तर तिसरी फेरी समुपदेशनाची असेल, अशी माहिती तंत्रशिक्षण सहसंचालक दयानंद मेश्राम यांनी दिली.

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेविषयी आणि फेर्‍यांविषयी विविध प्रकारची माहिती सध्या पसरवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मेश्राम म्हणाले,‘अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत मागील वर्षाप्रमाणेच तीन फेर्‍या असतील. बारावीच्या निकालानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. ती महिनाभर चालेल. न्यायालयाच्या आदेशानुसार एक ऑगस्टला वर्ग सुरू करायचे आहेत. त्यानुसार प्रवेशाचे वेळापत्रक ठरवले जात आहे.

अशी असेल प्रवेशप्रक्रिया
- केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमुळे ऑनलाइन अर्ज.
- अर्ज स्वीकृती केंद्रांवर कागदपत्रांची पडताळणी व त्यानंतर तात्पुरती गुणवत्ता यादी डीईटीच्या संकेतस्थळावर देणार.
- तेथेच विद्यार्थ्यांना तक्रार नोंदवता येईल, प्राप्त तक्रारींचे निवारण करून अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल.
- त्यानंतर प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी संस्थांचा पर्याय अर्ज भरावा लागेल. त्यानंतर कॅपची यादी प्रसिद्ध होईल.
बातम्या आणखी आहेत...