आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 1 Lakh 75 Thousand Students Give Medical Entrance Examination

पावणेदोन लाख विद्यार्थ्यांनी दिली वैद्यकीय प्रवेश परीक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी गुरुवारी राज्यभरात एक लाख ९४ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी सीईटी दिली. ३५ जिल्ह्यांमधून एकूण ५०६ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली.
या वर्षी मेडिकल सीईटी बारावीच्या विज्ञान अभ्यासक्रमावर आधारीत होती. त्यामुळे सीईटी देणा-यांच्या संख्येत यंदा तब्बल ४६ हजारांनी वाढ झाली. गेल्या वर्षी सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. सकाळी दहा ते दुपारी एक, अशी परीक्षेची वेळ होती, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी दिली.

संख्या का वाढली?
गेल्या वर्षापर्यंत वैद्यकीय सीईटी अकरावी आणि बारावी अशी मिळून असणा-या अभ्यासक्रमावर आधारीत होती. विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी दोन्ही वर्षांच्या अभ्यासक्रमाची तयारी करावी लागत होती. यंदा फक्त बारावीच्या विज्ञान विषयांवर आधारीत परीक्षा असल्याने संख्या वाढली असावी. तसेच निगेटिव्ह मार्किंगही काढून टाकण्यात आले आहे. अर्थात सीईटी देणा-यांची संख्या वाढली असली तरी राज्यात वैद्यकीय प्रवेशाच्या जागा २५०० असल्याने चुरस मोठी असेल. या परीक्षेचा निकाल जूनमध्ये जाहीर केला जाईल.