आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र : प्रेमी युगुल भेटत होते \'चोरी चोरी चुपके चुपके\', झाला गुदमरून मृत्‍यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - कुटुंबीयांच्‍या चोरून एकमेकांना भेटायला आलेल्‍या एका प्रेमी युगुलाचा श्‍वास गुरमरून करुण अंत झाल्‍याची घटना यमुनानगरातील एका प्‍लॅटमध्‍ये शनिवारी रात्री घडली. त्‍यामुळे परिसरात हळहळ व्‍यक्‍त केली जात आहे. धवल शंकर लगाडिया (वय-24, रा. यमुनानगर, निगडी) व मंदिरा रामलाल चौधरी (वय-26, रा. सीआरपीएफ ,तळेगाव) अशी मृतांची नावे आहेत.
कशी घडली घटना
सध्‍या विविध साथीच्‍या आजाराची साथ असल्‍याने शंकर लगाडिया यांनी त्‍यांच्‍या प्‍लॅटचे पेस्‍ट कंट्रोल करून घेतले. दरम्‍यान, रात्री या ठिकाणी कुणीच नव्‍हते. त्‍यामुळे शंकर यांचा मुलगा धवल हा हा आपली मैत्रीण मंदिरा हिला घरी घेऊन आला. मात्र, काही वेळाने पेस्ट कंट्रोलमुळे दोघांनाही श्‍वास घेण्‍यास अडथळा निर्माण झाला. दरम्‍यान, त्‍यांनी बाहेर येऊन मदत मागितली. त्‍यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी उपचारादरम्यान रात्री नऊच्या सुमारास धवलचा तर आज सकाळी सातच्या सुमारास मंदिरा हिचा मृत्यू झाला.
पुढे वाचा,
- पोलिसाच्‍या त्रासाला कंटाळून युवकाची आत्‍महत्‍या
- महेश मोतेवारांसह समृद्ध जीवनच्या संचालक मंडळावर गुन्‍हा दाखल