आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कला, क्रीडा गुणांचा अतिरिक्त बोनस? 100 टक्के गुण मिळण्याविषयीची चर्चा जोरात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल) - Divya Marathi
(फाईल)
पुणे - दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना  पैकीच्या पैकी गुण कसे मिळतात, विशेषत: भाषा विषयांत १०० गुण कसे मिळतात, हा विषय शैक्षणिक वर्तुळात जोरात चर्चिला जात आहे. बेस्ट फाईव्हच्या जोडीला नव्याने क्रीडा आणि कला क्षेत्रातील गुणांचा बोनस सुरू झाल्याने पैकीच्या पैकी प्रकरण सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
 
बोर्डाच्या  परीक्षेत टक्केवारीला महत्त्व प्राप्त झाल्याने शाळा, क्लासेस, कनिष्ठ महाविद्यालये सर्वच क्षेत्रांत उत्तीर्णांचा टक्का कसा वाढेल, याला प्राधान्य दिले जाते. खुद्द बोर्डाच्या पातळीवरही एटीकेटी सुविधा उपलब्ध आहे. दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला  एटीकेटी घेऊन अकरावीला प्रवेश घेता येतो. बेस्ट फाईव्ह (सर्वोत्तम पाच) निकषामुळे सहापैकी ज्या पाच विषयांची टक्केवारी अधिक असेल, तेच गुण ग्राह्य धरून निकाल लावला जातो. 
 
खेळाडू विद्यार्थ्यांना उत्तेजन देण्यासाठी गेल्या वर्षीपासून विशेष गुण देण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. श्रेणीसुधार, गुणसुधार योजना आधीपासून कार्यान्वित आहेत. या वर्षीपासून यामध्ये कलागुणांना उत्तेजन म्हणून अधिक गुण देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यात गायन, वादन, नृत्य, चित्रकला आणि लोककला असे पर्याय आहेत.
बातम्या आणखी आहेत...