आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 10 Th Result Declare, 83.84 Percent Result To Maharashtra

दहावीचा टक्का वाढला; राज्याचा निकाल 83.84%

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- राज्यात यंदा दहावीचा सर्वाधिक निकाल लागला असून 83.84 % विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्वच विभागांत 84.90% उत्तीर्णांसह मुली आघाडीवर राहिल्या. मुलांची टक्केवारी 82.24 आहे. बारावीप्रमाणे दहावीतही कोकण विभाग पहिला आला, तर लातूर विभागाची शेवटच्या स्थानी घसरण झाली. औरंगाबाद विभाग (81.18%) सहाव्या स्थानी आहे. गतवर्षी राज्याचा निकाल 81.32% होता.
>15 लाख चार हजार 135 विद्यार्थ्यांची नोंदणी
>14 लाख 99 हजार 276 विद्यार्थी परीक्षेस बसले
> 12 लाख 51 हजार 528 विद्यार्थी उत्तीर्ण

विभागनिहाय निकाल
कोल्हापूर 90.36%
मुंबई 88.92%
पुणे 88.25%
नाशिक 83. 86%
औरंगाबाद 81.18%
अमरावती 74.60%
नागपूर 73.99%
लातूर 73. 75%
कोकण 93.79 %

पास क्लास मिळवणारी
मुली: 42,750
मुले: 78,133

गुणपत्रिका 15 जूनला शाळेत मिळणार
राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी निकाल जाहीर केला. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निकाल फेरतपासणीची सुविधा उपलब्ध असून गुणपत्रिका 15 जूनला त्यांच्या शाळेतून मिळतील, अशी माहिती त्यांनी दिली.