आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 10 Thousand Crores Sanction To Cleaness In Maharashtra Dilip Sopal

स्वच्छता मोहिम राबवण्यासाठी केंद्राचे महाराष्ट्राला 10 हजार कोटी मंजूर - दिलीप सोपल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ‘ग्रामीण भागात स्वच्छता मोहिम राबवण्यासाठी केंद्राने महाराष्ट्राचा 10 हजार 400 कोटी रुपयांचा कृती आराखडा मंजूर केला आहे. येत्या दहा वर्षात आराखड्याची अंमलबजावणी होणार आहे,’ अशी माहिती पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री दिलीप सोपल यांनी बुधवारी दिली.


संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालखी सोहळ्यातील स्वच्छता दिंडीचा आरंभ सोपल यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ‘केंद्राच्या निर्मल भारत अभियानात ग्रामस्वच्छता मोहीमेचा अंतर्भाव करण्यात आला आहे. राज्यातल्या 27,902 ग्रामपंचायतींचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून यापैकी ९,523 गावे ‘निर्मल’ झाली आहेत. उर्वरित 14 हजार 879 गावातील स्वच्छतेची कामे अपूर्ण आहेत. यंदा साडेतीन हजार गावे निर्मल करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.