आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण करून हत्या, तिघांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- हडपसरयेथील तरुणाने एका १० वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. मुलाने आरडाओरड केल्याने तरुणाने मुलाचे डोके पाण्यात बुडवून त्याला बेशुद्ध करत गळा आवळून त्याचा खून केला. नंतर आईवडिलांच्या मदतीने मृतदेह घाटात टाकला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

ओम अजित बोरकर (१०) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव असून पोलिसांनी याप्रकरणी ऋषल मधुकर कळाणे (१८), मधुकर कळाणे नलिनी मधुकर कळाणे या तीन आरोपींना अटक केली आहे. हडपसरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित मोहिते यांनी सांगितले की, ओम बोरकर हा हडपसरमध्ये सातववाडी येथे राहणारा चौथीचा विद्यार्थी होता. बुधवारी संध्याकाळी क्लासला जात असताना त्याचे अपहरण ऋषलने करून त्याला बळजबरीने घरी नेले. त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न करून त्याची हत्या केली.

केला असता, ओमने आरडाओरडा केली. हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून ऋषलने ओमचे डोके पाण्यात बुडवून त्याला बेशुध्द केले. त्याचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह कॉटखाली ठेवला. ऋषलने ही बाब त्याच्या आईवडीलांना सांगितली. त्यांनीही ओमचा मृतदेह पोत्यात भरुन रात्रभर तासात ठेवला.

आरोपी ऋषल याचे वडील मधुकर कळाणे हे रिक्षाचालक असून, त्यांनी सदर घटना घडल्यानंतर पत्नी नलिनी मुलगा ऋषल यांच्याशी संगनमत करुन मृतदेह रिक्षात टाकून सकाळी बोपदेव घाटात फेकून दिला. पोलिस तपासात ओमने खुनाची कबुली दिली आहे. ऋषल 12वी नापास असून सध्या बेकार आहे.