आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावी-बारावी परीक्षा शुल्कात होणार वाढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- आर्थिक दुरवस्था टाळण्यासाठी राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुढील शैक्षणिक वर्षापासून (२०१७) दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला अाहे, अशी माहिती प्रवक्ते प्रशांत रेडीज यांनी दिली. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यामागे ७५ रुपये शुल्कवाढ होणार आहे.

‘परीक्ष नियोजन, अंमलबजावणी, तयारी, परीक्षासाहित्य आणि छपाईवर प्रचंड खर्च करावा लागतो. या खर्चांची रक्कम दरवर्षी वाढत असते. मंडळ स्वायत्त असले तरी राज्य शासनाने काही आर्थिक भार उचलावा, अशीही विनंती करण्यात येईल.’ असे रेडीज म्हणाले. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या कलचाचणीचा आर्थिक भारही मंडळावर पडला आहे. शासनाने स्वयंसेवी संस्थांकडून कलचाचणी करुन घ्यावी, अशीही विनंती केली जाईल, अशी माहिती राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाकडून देण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून मंडळ ठेवी मोडून खर्च भागवत अाहे. अाता सातव्या वेतन आयोगाचा बोजाही आहे.

खर्च वाढला
>विना मूल्यकन चाचणीचा भार मंडळावर पडला. छपाई, दळणवळण हे खर्चही वाढताहेत. पाच वर्षांनी शुल्क वाढ हाेतेच, पण पण आता त्वरित करणे गरजेचे अाहे.
-गंगाधर म्हमाणे, अध्यक्ष, शिक्षण मंडळ.

दहावीचे शुल्क असे
विद्यार्थी पूर्वीचे शुल्क नवीन शुल्क
नियमित विद्यार्थी ३४० रुपये ४१५ रुपये
पुनर्परीक्षार्थी ३३० रुपये ४०५ रुपये
१७ नंबर फार्म ३४० रुपये ४१५ रुपये
श्रेणीसुधारसाठी ६०० रुपये ७५० रुपये


बारावीचे शुल्क असे
नियमितविद्यार्थी ३२५ रुपये ४०० रुपये
एमसीव्हीसी ३२५ रुपये ४०० रुपये
द्विलक्ष्यी अभ्यासक्रम ३२५ रुपये ४०० रुपये
श्रेणीसुधार ६५० रुपये ८०० रुपये

बातम्या आणखी आहेत...