आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीची परीक्षा आजपासून; 245 भरारी पथके, व्हिडिओ चित्रण करणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) लेखी परीक्षा शनिवारपासून (दोन मार्च) सुरू होत आहे. राज्यभरातील मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येणार्‍या या परीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी शुक्रवारी दिली. दहावीच्या परीक्षेसाठी मंडळाच्या औरंगाबाद, नाशिक, लातूर, अमरावती, पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूर आणि कोकण या विभागीय मंडळांतून एकूण 17 लाख 40 हजार 290 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये नऊ लाख 66 हजार 291 विद्यार्थी तर सात लाख 73 हजार 999 विद्यार्थिनींचा समावेश आहे. राज्यात एकूण तीन हजार 812 परीक्षा केंद्रे असून एकूण वीस हजार 507 शाळांतून नोंदणी झाली आहे, असेही जाधव यांनी सांगितले.

प्रशासन सज्ज
>245 भरारी पथकांची स्थापना
> जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली नेमल्या दक्षता समित्या
> परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देणार
> काही ठरावीक ठिकाणी परीक्षेचे व्हिडिओ चित्रण करणार