आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- बारावीप्रमाणे दहावीतही यंदा कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण 93.79 टक्के निकालासह पहिल्या क्रमांकावर आहे. विभागनिहाय कोल्हापूर 90.36%, मुंबई 88.92%, पुणे 88.25%, नाशिक 83.86%, औरंगाबाद, 81.18%, अमरावती 74.60% तर नागपूरचा निकाल 73.99% लागला. लातूर विभाग मात्र 73.75% निकालसह सर्वात शेवटच्या स्थानी राहिला.
मराठवाड्यात बीड अव्वल
दहावी परीक्षेत बीड जिल्ह्याने औरंगाबाद विभागात अव्वल स्थान पटकावले. यंदा जिल्ह्याचा निकाल 88.24 टक्के लागला असून उत्तीर्णांमध्ये मुलीच अधिक आहेत. 20 हजार 640 मुले व 14 हजार 756 मुली अशा एकूण 35396 विद्यार्थ्यांनी मार्चमध्ये परीक्षा दिली होती. यातील 17993 मुले (87.18 टक्के) व 13239 मुली (89.72 टक्के) उत्तीर्ण झाल्या आहेत. गतवर्षीही बीड जिल्हा अव्वल स्थानावर होता.
गैरप्रकारांत नागपूर आघाडीवर
कॉपी, तोतयेगिरी व अन्य गैरप्रकार करण्याचे प्रमाणही यंदा घटले. 2009 मध्ये 0.34 % (5366 प्रकरणे), 2010 मध्ये 0.17 (2751), 2011 मध्ये 0.20 (3264), 2012 मध्ये 0.11 (1809) असे प्रमाण होते. या वर्षी ते केवळ 0.09 टक्के आहे. मंडळाच्या ‘गैरमार्गाशी लढा’ या उपक्रमाचा हा सकारात्मक परिणाम आहे. या वर्षी सर्वाधिक गैरप्रकार नागपूर येथे 524 इतके आढळले. त्याखालोखाल नाशिक 318, लातूर 245, पुणे 212, अमरावती 144, कोल्हापूर 85, औरंगाबाद 71, मुंबई 44 तर कोकणात सर्वांत कमी गैरप्रकार (अवघे 6) आढळले.
काही वैशिष्ट्ये
>81 शाळांनी भोपळाही फोडला नाही
>02% रिपीटर्सचा निकाल घटला
>02% निकालाचे प्रमाण वाढले
>100% निकालाच्या 2709 शाळा
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.